टोकियो ऑलिपिंकनंतर भारतीय क्रिडापटू टोकियो पॅरालिंपिक २०२१ मधील दमदार प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधत आहेत. शनिवार रोजी (०४ सप्टेंबर) मिश्र ५० मीटर पिस्टल एसएच १ नेमबाजी खेळात भारतीय नेमबाज मनीष नरवाल आणि सिंहराज अडाना यांनी पदके जिंकत इतिहास रचला आहे. मनीष सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे, तर सिंहराजनेही रौप्य पदक पटकावले आहे. यासह यंदाच्या पॅरालिंपिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या १५ वर पोहोचली आहे.
१९ वर्षीय मनीषने २१८.२ गुणांसह सुवर्णपदाकाला गवसणी घातली आहे. याबरोबरच सर्वाधिक गुणांचा नवा विक्रमही प्रस्थापितही केला आहे. दुसरीकडे सिंहराजने २१६.७ गुणांसह आपले दुसरे पदक जिंकले आहे. यापूर्वी पुरुषांच्या १० मीटर एयर पिस्टल एसएच १ स्पर्धेत त्याने कांस्य पदक मिळवले होते. या २ भारतीय नेमबाजानंतर आरपीएसचा सर्गेई मालिशेव कांस्य पदक पटकावत तिसऱ्या स्थानावर आहे.
#GOLD for 19-year-old Manish Narwal! 🤯#IND have won their 14th #Paralympics medal, completing a 1-2 in the Mixed 50m Pistol SH1 Final with Singhraj Adhana finishing 2⃣nd! 💪#Tokyo2020 #ShootingParaSport pic.twitter.com/Wvkx8enKnE
— Olympic Khel (@OlympicKhel) September 4, 2021
👏👏👏#IND's Singhraj Adhana wins his second medal of the #Tokyo2020 #Paralympics – a #Silver in the Mixed 50m Pistol SH1 Final! 🔥
It's 1⃣5⃣ medals for 🇮🇳! #ShootingParaSport pic.twitter.com/7h9yDG0MJK
— Olympic Khel (@OlympicKhel) September 4, 2021
भारताच्या पदकांची संख्या १५ वर
या २ पदकांसह भारताने आपलाच विक्रम मोडत इतिहास घडवला आहे. सध्या भारताच्या झोळीत एकूण १५ पदके आहेत. त्यातील ३ सुवर्णपदके आहेत. तर ७ रौप्य आणि ५ कांस्य पदके आहेत. हे पॅरालिंपिकच्या इतिहासातील भारताचे आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. यापूर्वी भारताने २०१६ मध्ये रियो पॅरालिंपिकमध्ये २ सुवर्णपदकांसह एकूण ४ पदके पटकावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टोकियो पॅरालिम्पिक: ‘भारताची लेक’ अवनी लेखराने घडवला इतिहास, एकाच वर्षी जिंकली २ पदके
प्रवीण कुमारची ‘उंच उडी’, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी रौप्य पदक जिंकत घडवला इतिहास