साउथॅम्पटन। आयसीसी 2019 विश्वचषकात आज(5जून) आठवा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात होणार आहे. भारताचा हा या विश्वचषकातील पहिला सामना आहे. या विश्वचषक विजेतेपदासाठी भारताला अनेक दिग्गजांनी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारताकडून सर्वांनाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
भारताने आत्तापर्यंत विश्वचषक इतिहासात जेव्हाही त्यांचा पहिला सामना जिंकला आहे, तेव्हा तेव्हा स्पर्धेत पुढे चांगली कामगिरी केली आहे. भारताने आत्तापर्यंत याआधी झालेल्या 11 विश्वचषकांपैकी 1983,1996, 2003, 2011 आणि 2015 या 5 विश्वचषकात त्यांचा पहिला सामना जिंकला आहे.
विशेष म्हणजे या पाच विश्वचषकांपैकी भारताने 1983 आणि 2011 मध्ये विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तर 2003 मध्ये भारतीय संघाने उपविजेतेपद मिळवले होते. तसेच 1996 आणि 2015 मध्ये भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला होता.
त्याचबरोबर भारताला 1975, 1979, 1987, 1992, 1999 आणि 2007 या विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या विश्वचषकांमध्ये भारताची पुढील कामगिरीही खास झाली नव्हती.
या 6 विश्वचषकांपैकी भारत 1975, 1979,1992 आणि 2007 या विश्वचषकांमध्ये साखळी फेरीतच बाद झाला होता. तर 1999 च्या विश्वचषकात भारताने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला होता. तसेच 1987 च्या विश्वचषकात मात्र भारताला पहिला सामना पराभूत झाल्यानंतरही उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळाले होते.
भारताचा हा इतिहास पाहता भारताला चांगली सुरुवात मिळाली तर भारतीय संघाची स्पर्धेतील कामगिरी चांगली होती. त्यामुळे 2019 च्या या विश्वचषकातही भारतीय संघ विजयाने त्यांची या स्पर्धेतील सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
विश्वचषकात भारतीय संघ जेव्हा जेव्हा पहिला सामना जिंकलाय तेव्हा-
1983 – विजेतेपद
1996 – उपांत्यफेरी
2003 – उपविजेता
2011 – विजेतेपद
2015 – उपांत्यफेरी
2019 – भारत जिंकणार का पहिला सामना?
विश्वचषकात भारतीय संघ जेव्हा जेव्हा पहिला सामना जिंकलाय तेव्हा-
१९८३- 🏆
१९९६- उपांत्यफेरी
२००३- उपविजेता
२०११- 🏆
२०१५- उपांत्यफेरी
२०१९- जिंकणार का पहिला सामना मग?#म #मराठी @Mazi_Marathi #CWC19 #TeamIndia #ProteaFire #INDvSA— Sharad Bodage (@SharadBodage) June 5, 2019
जेव्हा जेव्हा भारत विश्वचषकात पहिल्या सामन्यात पराभूत झालाय तेव्हा
१९७५, १९७९, १९९२, २००७- साखळी फेरीतून बाहेर
१९९९- सुपर सिक्स
१९८७- सेमीफायनल#ViratKohli #म #मराठी @Mazi_Marathi #CWC19 #TeamIndia #ProteaFire #INDvSA https://t.co/qyxyDGHCr6— Sharad Bodage (@SharadBodage) June 5, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: …तर आजचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होऊ शकतो रद्द
–ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले त्याचाच विक्रम आज धोनी मोडणार?
–रोहित शर्माला आज विश्वचषकात हिट विक्रम करण्याची संधी, सौरव दादालाही टाकू शकतो मागे
–किंग कोहलीला आहे आज विराट विक्रम करण्याची संधी
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या अंतिम ११ जणांमध्ये या खेळाडूंना मिळू शकते संधी