सध्या आयसीसी मेगा स्पर्धा म्हणजेच चॅम्पियन्स ट्राॅफी (Champions Trophy) खेळली जात आहे. तत्पूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही फॉरमॅटची जादू दिसून येते. ज्यामध्ये कसोटी क्रिकेटनंतर, वनडे फाॅरमॅटचा उत्साहही वेगळाच दिसतो. पण चाहत्यांचा टी20 फॉरमॅटकडे कल थोडा जास्त असल्याचे दिसून येते. पण वनडे क्रिकेटची स्वतःची एक खास क्रेझ आहे. या फॉरमॅटमध्ये अनेक उत्तम फलंदाज झाले आहेत. ज्यांनी अनेक शतके झळकावली आहेत.
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीपासून (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) सारख्या अनेक खेळाडूंनी वनडे सामन्यांमध्ये अनेक शतके झळकावली आहेत.
खेळाडूंमध्ये, वनडे शतकांच्या बाबतीत विराट कोहली (Virat Kohli) आघाडीवर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्या संघाच्या खेळाडूंनी सर्वाधिक शतके केली आहेत? तर चला तर या बातमीद्वारे आपण त्या 3 संघाबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावली आहेत.
1) भारत- 323 शतके- वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांचे प्रचंड वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत, भारताने या फॉरमॅटमध्ये काही महान फलंदाज निर्माण केले आहेत. जिथे या सर्व खेळाडूंनी मिळून भारतासाठी आतापर्यंत 323 शतके झळकावली आहेत. भारताने आतापर्यंत एकूण 1,063 वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये इतकी शतके झाली आहेत. त्यापैकी विराट कोहलीने 51 शतके आणि सचिन तेंडुलकरने 49 शतके झळकावली आहेत. म्हणजेच या दोन्ही फलंदाजांनी 100 शतके झळकावली आहेत.
2) ऑस्ट्रेलिया- 252 शतके- जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची पातळी वेगळी राहिली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने एक वेगळाच दबदबा दाखवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. 6 वेळा वनडे विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाकडे अनेक उत्तम फलंदाज आहेत. या फलंदाजांनी मिळून 1,011 सामन्यांमध्ये 252 शतके केली आहेत. दरम्यान रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) सर्वाधिक शतके म्हणजे 30 शतके झळकावली आहेत.
3) पाकिस्तान – 229 शतके- पाकिस्तान क्रिकेट संघ आज संघर्ष करताना दिसू शकतो. पण एक काळ असा होता जेव्हा या संघाचे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व होते. पाकिस्तान त्यांच्या उत्तम गोलंदाजांसाठी ओळखला जातो. पण असे अनेक फलंदाज झाले आहेत. ज्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत 984 वनडे सामन्यांमध्ये 229 शतके ठोकली आहेत. त्यांच्याकडून, सईद अन्वरने सर्वाधिक 20 शतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमला माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला गुरूमंत्र…! बाबरच्या बॅटमधून पडणार धावांचा पाऊस?
“सचिनचा 100 शतकांचा रेकाॅर्ड मोडू शकतो विराट” माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
अफगाणिस्तानने रचला इतिहास; आयसीसीमध्ये प्रथमच मोठी कामगिरी..!