भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ १७ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. या मालिकेपूर्वी दोन्ही संघाच्या अंतिम ११ मधील खेळाडूंबाबत विचार विनिमय सुरू आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मलिका विजय मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन भारतात परतणाऱ्या विराट ऐवजी उर्वरित ३ सामन्यांसाठी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी द्यावी याबाबत विचार विनिमय सुरू आहे. या सर्व घडामोडीत ३ भारतीय खेळाडू असे आहेत ज्यांना कसोटी मालिकेत संधी मिळणे फार अवघड आहे
१. शुबमन गिल
युवा फलंदाज शुबमन गिल हा मागील १ वर्षापासून भारतीय संघासोबत आहे. मात्र, अजूनही त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे गिलला बराच काळ वाट बघावी लागली आहे. विराट व रोहितच्या अनुपस्थितीत गिलला संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, पहिल्या सराव सामन्यातील त्याची खराब कामगिरी बघता संघ व्यवस्थापन त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत संधी देण्याची शक्यता फारच कमी आहे.
२. रिषभ पंत
युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला देखील भारताच्या कसोटी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात वृद्धिमान साहाने अंतिम ११ मध्ये यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळवले होते. अनेक क्रिकेट पंडित वृद्धिमान साहाला वर्तमान क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षक असल्याचे म्हणतात. त्यामुळे साहाच्या उपस्थितीत पंतला संघात स्थान मिळणे अवघड वाटत आहे.
३. मोहम्मद सिराज
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आहे. मात्र, त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भारताकडे उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसारखे वेगवान गोलंदाज आहेत. तसेच, नवदीप सैनी देखील कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी सज्ज आहे. अशा परिस्थितीत सिराजला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत