भारतीय क्रिकेट संघाने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. अजिंक्य रहाणेने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला शानदार विजय मिळवून दिला होता. भारताने ही कसोटी मालिका २-१ ने जिंकली होती. भारताने आजवर मिळवलेल्या चित्तथरारक विजयांपैकी ही एक मालिका होती. आता या रोमांचक मालिकेवर आधारलेली दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ‘बंदो में था दम’ वेबसीरिज घेऊन येत आहेत.
‘बंदो में था दम’ वेब सीरिज १६ जून रोजी वूट सिलेक्टवर दाखवली जाईल. अॅशेस मालिकेसंदर्भात ‘द टेस्ट’ सीरिज अॅमेझॉन प्राइमवर आली होती. याच धर्तीवर ही मालिकाही तयार करण्यात आली आहे. त्या कसोटी मालिकेत भाग घेतलेल्या अनेक खेळाडूंची विधाने त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. यासोबतच सामन्यादरम्यानचे किस्सेही दाखवले जाणार आहेत.
When everything was against them, they stood tall and showed the world their true grit, strength and determination.
Witness the story of the greatest fightback. The story behind India’s biggest triumph in Test history.#BandonMeinThaDum – The fight for India’s pride. pic.twitter.com/T6ilpxIbgH
— Voot Select (@VootSelect) June 1, 2022
या वेब सीरिजमध्ये भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, फिरकीपटू आर अश्विन, सलामीवीर चेतेश्वर पुजारा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि हनुमा विहारी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबद्दल सांगताना दिसणार आहेत. याशिवाय भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि सामना कव्हर करणारे पत्रकारही या वेब सीरिजमध्ये त्यांचे अनुभव शेअर करतील.
दरम्यान, येत्या १६ जून रोजी वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका प्रदर्शित होणार असून भारतीय क्रिकेट संघाने रचलेल्या अविस्मरणीय विजयाचे पुन्हा एकदा साक्षीदार होण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी यापूर्वी ‘स्पेशल ऑप्स’, ‘अ वेनस्डे’, ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘अय्यारी’, ‘बेबी’ आणि ‘स्पेशल २६’ या सर्वांचे दिग्दर्शन केले आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराला दहा वर्षांपूर्वी समजलेलं कसा होणार आपला मृत्यू!