रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 2024 टी20 विश्वचषकात धुमाकूळ घालत उपांत्य फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केले आहं. शनिवारी (22 जून) झालेल्या सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. सुपर-8 फेरीतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे.
या पराभवासह बांगलादेशचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सध्या गट-1 मधील पुढील सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ पराभूत झाला, तर टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 197 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ 8 विकेट गमावून केवळ 146 धावाच करू शकला. बांगलादेशसाठी कर्णधार नझमुल हुसैन शांतोनं 32 चेंडूत 40 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर तनझिम हसननं 29 आणि रिशाद हुसेननं 24 धावा केल्या. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं सर्वाधिक 3 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 5 गडी गमावून 196 धावा केल्या. भारताच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिलं. विराट कोहलीनं 28 चेंडूत 37 धावा, ऋषभ पंतनं 24 चेंडूत 36 धावा आणि शिवम दुबेनं 24 चेंडूत 34 धावा केल्या. तर सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मानं 11 चेंडूत 23 धावा ठोकल्या.
अखेरीस अष्टपैलू हार्दिक पांड्यानं 27 चेंडूत नाबाद 50 धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज तनझिम हसन आणि फिरकी गोलंदाज रिशाद हुसेननं 2-2 बळी घेतले. याशिवाय शाकिब अल हसनला एक बळी मिळाला. हार्दिक पांड्यानं फलंदाजीत अर्धशतकासह गोलंदाजीत एक विकेट घेतली. त्याला त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
नाद करा पण कोहलीचा कुठं! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
हार्दिक पांड्याचं विस्फोटक अर्धशतक! भारताचं बांग्लादेशसमोर 197 धावांचं आव्हानं
IND vs BAN सामन्यात बांग्लादेशनं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11