बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली. भारतीय फलंदाजांकडून या सामन्यात एकूण 18 षटकारांचा पाऊस पाडला. या षटकारांमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापुढे 400 धावांचे आव्हान उभे केले होते, जे पार करण्यात त्यांना अपयश आले. त्यांचा डाव 217 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने 99 धावांनी सामना जिंकला. भारताने या सामन्यात पाडलेल्या षटकारांच्या पावसामुळे एक जागतिक विक्रम नावावर केला.
भारताचा जागतिक विक्रम
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडेत एक भीमपराक्रम केला. भारतीय संघाच्या डावादरम्यान एकूण 18 षटकार मारले गेले. यासोबत भारतीय संघ वनडे क्रिकेटच्या इतिहासात 3000 षटकार मारणारा जगातील पहिला संघ बनला. आता भारताच्या नावावर वनडेत 3007 षटकारांची नोंद आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिज संघ आहे. त्यांच्या नावावर 2953 षटकार आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी पाकिस्तान संघ असून त्यांच्या नावावर 2566 षटकारांची नोंद आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ या यादीत चौथ्या स्थानी असून त्यांच्या नावावर 2486 आणि पाचव्या स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाच्या नावावर 2387 षटकारांची नोंद आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे संघ
भारत- 3007*
वेस्ट इंडिज- 2953
पाकिस्तान- 2566
ऑस्ट्रेलिया- 2486
न्यूझीलंड- 2387
सामन्याचा आढावा
शुबमन गिल (104) आणि श्रेयस अय्यर (105) यांच्या शतकी खेळी आणि 200 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाने शानदार सुरुवात केली होती. या दोघांव्यतिरिक्त केएल राहुल (KL Rahul) याने 52, तर इशान किशन (Ishan Kishan) याने 31 धावा केल्या. मात्र, शेवटी फक्त 37 चेंडूत नाबाद 72 धावांची झंझावाती खेळी साकारणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने संघाची धावसंख्या 399 पर्यंत पोहोचवली. भारताचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील सर्वात मोठी धावसंख्यादेखील आहे. तसेच, एकूण पाहायचं झालं, तर भारताची ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे.
वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या
481/6 – इंग्लंड, नॉटिंघम, 2018
438/9 – दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2006
416/5 – दक्षिण अफ्रीका, सेंच्युरियन, 2023
399/5 – भारत, इंदोर, 2023*
383/6 – भारत, बंगळुरू, 2013 (india became the first team in history to complete 3000 odi sixes ind vs aus series 2023 read here more)
महत्त्वाच्या बातम्या-
‘डोकं एक, डोकेदुखी अनेक…’, विश्वचषकापूर्वी भारताच्या जबरदस्त विजयाबाबत सेहवागचे मोठे विधान
‘श्रेयस-गिलनंतर राहुल आणि सूर्याने तेच केले, जे…’, पराभवानंतर स्मिथची सर्वात मोठी प्रतिक्रिया