भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या फिरकी ट्रॅकवर खेळला गेला. किवी संघाने हा सामना 113 धावांनी जिंकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी एकूण 18 विकेट्स घेतल्या. एक फलंदाज धावबाद झाला. या सामन्यात एकट्या मिचेल सँटनरने 13 विकेट घेतल्या. यानंतर आता भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात पटाईत नाहीत. असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
भारतीय फलंदाज फिरकीपटूंसमोर झगडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. अशा परिस्थितीत, या बातमीद्वारे जाणून घेऊयात की, कोणत्या संघाची फिरकीमध्ये फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम आहे, आणि फिरकीच्या बाबतीत अव्वल देशांचे आकडे कसे आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय क्रिकेट संघ फिरकी खेळण्याच्या बाबतीत पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या मागे आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांत या देशांनी भारतापेक्षा चांगली फिरकी खेळली आहे. 2020 पासून आशियातील फिरकीपटूंविरुद्ध भारताची सरासरी 36.9 आहे. तर पाकिस्तानने 45.5 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर बांग्लादेशची फिरकीविरुद्ध सरासरी 40 होती. या यादीत श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने फिरकीविरुद्ध 47.1 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे आकडे 2020 पासून आशियामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांचे आहेत. याचा अर्थ 2020 पासून आम्ही आशियातील खेळपट्ट्यांवर कोणत्या देशाची फिरकी विरुद्ध सरासरी आहे. याची माहिती देत आहोत. तसेच, हे आकडे एक ते सातव्या क्रमांकापर्यंतच्या फलंदाजांचे आहेत.
पाहा आकडेवारी….
श्रीलंका- 47.1
पाकिस्तान- 45.5
बांग्लादेश- 40
भारत- 36.9
ऑस्ट्रेलिया- 35.9
इंग्लंड- 31.5
दक्षिण आफ्रिका- 31.5
न्यूझीलंड- 29.5
वेस्ट इंडिज- 27.6
हेही वाचा-
“जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात यावं”, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला
WTC पॉइंट टेबलमधील भारताचे वर्चस्व धोक्यात, आता आणखी एक सामना गमावल्यास…
“खडतर आव्हान द्यायचे होते…”, किवी कर्णधाराने सांगितले न्यूझीलंडच्या विजयाचे रहस्य