भारतीय संघाने केएल राहुलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यातील (ZIMvsIND) वनडे मालिका ३-० अशी जिंकली आहे. यावेळी भारताकडून शुबमन गिल आणि इशान किशन यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने सोमवारी (२२ ऑगस्ट) या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकताच भारताने पाकिस्तानच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
भारताचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विक्रम
भारताने यजमान संघ झिम्बाब्वेला तीन सामन्यांंच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केले. याचबरोबर भारताने पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने आतापर्यंत झिम्बाब्वे विरुद्ध ५४ वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने झिम्बाब्वे विरुद्ध ६२ वनडे सामने खेळले असून त्यातील ५४ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. यामुळे भारतही आता झिम्बाब्वे विरुद्ध सर्वाधिक वनडे सामने जिंकणाऱ्या संघामध्ये पाकिस्तानची बरोबरी केली आहे.
भारतीय गोलंदाजांची कमाल
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आहे. तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा (Sikandar Raza) याची फलंदाजी पाहून एका क्षणाला वाटले होते की भारत हा सामना गमावणार. मात्र शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) याच्या चेंडूवर शुबमन गिल (Shubman Gill) याने उत्तम झेल घेतला.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये विशेष कामगिरी केली आहे. आवेश खान याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दीपक चाहर, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
केएल राहुल याने तिसऱ्या सामन्यात नाणफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि राहुल यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली, मात्र ते दोघेही मोठी खेळी करू शकले नाही. धवनने ४० धावा आणि राहुलने ३० धावा केल्या. यानंतर आलेल्या गिल आणि किशन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १२७ चेंडूत १४० धावांची भागीदारी केली. किशनने ५० आणि गिलने १३० धावा केल्या. या दोघांच्या जोरदार खेळीने भारताने ५० षटकात ८ विकेट्स गमावत २८९ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून रझाने ११५ आणि सिन विलियम्स याने ४५ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकत सलग दुसऱ्यांदा मालिकावीर बनला शुबमन, ‘बाप’माणसाला पुरस्कार केला समर्पित
‘त्याला टी२० संघात घेण्याची शक्यता नाममात्र!’ कुलदीप यादवच्या निवडीबाबत माजी दिग्गजाचे विधान
..म्हणूनच इंडियन सर्वांच्या हृदयावर राज्य करतात! शतकवीर सिकंदरची भारतीय खेळाडूंनी थोपटली पाठ