भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊल ठेवताच इतिहास रचला. पुजारा हा कसोटी कारकीर्दीतील 100वा कसोटी सामना खेळत आहे. पुजारा 100 कसोटी खेळणारा भारताचा 13 वा खेळाडू बनला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारतासाठी पहिला 100वा कसोटी सामना खेळणारे दिग्गज सुनील गावसकर यांनी पुजाराचा खास सन्मान केला.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला सामन्यापूर्वी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी 100व्या कसोटी सामन्याची टोपी भेट म्हणून दिली. गावसकरांनी खास शतकाच्या क्लबमध्ये पुजाराचे स्वागत केले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना भारतीय क्रिकेटचा इतिहास एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाला. पुजाराच्या या खास दिवशी त्याचे संपूर्ण कुटुंब स्टेडिअममध्ये उपस्थित होते. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
𝗔 𝗺𝗼𝗺𝗲𝗻𝘁 𝘁𝗼 𝗰𝗵𝗲𝗿𝗶𝘀𝗵! 💯
Golden words from the legendary Sunil Gavaskar as he felicitates @cheteshwar1 on his landmark 100th Test 👏🏻👏🏻#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/AqVs6JLO2n
— BCCI (@BCCI) February 17, 2023
यावेळी पुजारा म्हणाला की, “धन्यवाद सनी भाई, तुमच्याकडून ही भेट स्वीकारून सन्मानित झाल्याची भावना आहे. तुमच्यासारख्या दिग्गजाने मला प्रेरणा दिली आहे. युवा वयात मी नेहमी भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले, परंतु कधीच विचार केला नव्हता की, भारतासाठी 100 कसोटी खेळू शकेल. माझा असा विश्वास आहे की, कसोटी क्रिकेट हा खेळाचा खरा प्रकार आहे. हा क्रिकेट प्रकार तुमच्या स्वभावाची परीक्षा घेतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आयुष्य आणि कसोटी क्रिकेटमध्ये बरेच साम्य आहे. जर तुम्ही कठीण काळात लढू शकता, तर तुम्ही नेहमी अव्वलस्थानी पोहोचाल. मला अभिमान वाटत आहे. सर्व युवा खेळाडूंना सांगू इच्छितो की, मी तुम्हाला कठोर मेहनत आणि भारतासाठी खेळण्यासाठी प्रोत्साहित करेल. माझे कुटुंब, मित्र आणि सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. बीसीसीआय, मीडिया, माझे संघसहकारी आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांचे धन्यवाद.”
भारतीय संघाने दिले गार्ड ऑफ ऑनर
भारतीय संघाने पुजाराचा 100वा कसोटी सामना खूपच खास बनवला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मैदानावर जाण्यापूर्वी पुजाराला गार्ड ऑफ ऑनर (Guard of Honour) दिला. बीसीसीआयने यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
A guard of honour and a warm welcome for @cheteshwar1 on his 1⃣0⃣0⃣th Test 😃👌#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/jZoY1mjctu
— BCCI (@BCCI) February 17, 2023
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम अकरामध्ये 2 बदल केले आहेत, तर भारताने एक बदल केला आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर याची एन्ट्री झाली आहे. (india cricket team gives guard of honour to cheteshwar pujara on his 100th test match sunil gavaskar also seen in the video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच