भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर आहे. मात्र असे असले तरी त्याने त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक खूशखबर दिली आहे. त्याने अधिकृतरित्या सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक बरोबर प्रेमसंबंध असल्याचे जाहीर केले आहे.
त्याने आज(1 जानेवारी) नताशाला एंगेजमेंट रिंग घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्याने या फोटोला ‘मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्तान. 01.01.2020’, असे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/B6xrw7WlubB/
विशेष म्हणजे काल(31 डिसेंबर) त्याने नताशाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोबरोबरच त्याने तिच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचे जाहीर केले होते.
https://www.instagram.com/p/B6vsadJlcUX/
या फोटोवर हार्दिकचे संघसहकारी केएल राहुल आणि युजवेंद्र चहल यांनीही एमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिल्या होत्या.

मागील अनेक दिवसांपासून हार्दिक आणि नताशामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. पण अखेर आता हार्दिकनेच नताशाला एंगेजमेंट रिंग घातल्याचा फोटो शेअर केल्याने, ही चर्चा खरी असल्याचे समोर आले आहे.
मयंक अगरवाल म्हणतो, ही द्विशतकी खेळी खास!
वाचा- ????https://t.co/zo9veMFsUB????#म #मराठी #Cricket #TeamIndia @mayankcricket— Maha Sports (@Maha_Sports) January 1, 2020
एमएस धोनीचा हा फोटो होतोय जोरदार व्हायरल…
वाचा????https://t.co/gshroRW5CR????#Cricket #MSDhoni #म #मराठी @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) January 1, 2020






