दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेची रविवारी (17 डिसेंबर) सुरूवात झाली. मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला गेला असून भारताने यात 8 विकेट्स राखून विजय मिळवला. साई सुदर्शन याने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तशेच अर्शदीप सिंगचे योगदान या विजयासाठी महत्वाचे ठरले. 200 चेंडू बाकी असताना भारताने हा सामना जिंकला.
भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी अवघ्या 117 धावांचे आव्हान मिळाले होते. अर्शदीप सिंग () याने 10 षटकात 37 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. या प्रदर्शनाच्या जोरावर यजमान संघाला भारताने अवघ्या 116 धावांवर सर्वबाद केले. प्रत्युतत्तरात 117 धावांचे लक्ष्य भारताने 2 विकेट्सच्या नुकसानावार आणि 16.4 षटकात गाठले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 10 चेंडूत 5 धावा केल्यानंतर विकेट गमावली. पण साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी वैयक्तिक अर्धशतकांचे योगदान दिले. 45 चेंडूत 52 धावांची खेळी केल्यानंतर अय्यरने विकेट गमावली. तर साईने मात्र 55* धावांसह शेवटपर्यंत विकेट सोडली नाही. तिलक वर्मा याने 1* धावा केल्या.
भारतासाठी या सामन्यात आवेश खान यानेही अप्रतिम गोलंदाजी केली. आवेशने टाकलेल्या 8 षटकांमध्ये 27 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनेही एक विकेट घेतली. (INDIA DEFEAT SOUTH AFRICA IN PINK ODI WITH 200 BALLS TO SPARE.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका संघ-
रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), डेविड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघाला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूची वर्णी
सचिनचा मुंबई इंडियन्सला टाटा-गुडबाय? सोशल मीडियावर रंगलीय एकच चर्चा, लगेच वाचा






