सध्या शारीरिकदृष्ट्या अक्षम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा खेळली जात आहे. यामध्ये भारतीय संघाने जोरदार सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने पाकिस्तानसमोर जिंकण्यासाठी 161 धावांचे लक्ष्य उभारले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ केवळ 51 धावांवरतीच ढेपाळला.
वास्तविक भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दरम्यान भारताने 19 षटकात 4 गडी गमावून 160 धावा केल्या. भारतासाठी निखिलने 59 धावा केल्या. त्याच वेळी, कर्णधार विक्रांत केनीने 37 धावांची वादळी खेळी खेळली. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ अवघ्या 51 धावसंख्येवर गडगडला.
जितेंद्र व्हीएनने भारतासाठी प्राणघातक गोलंदाजी केली. त्याने फक्त 5 धावा देत सर्वाधिक 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. पाकिस्तानसाठी अब्दुला एजाजने सर्वाधिक 11 धावांची खेळी खेळली.
शारीरिकदृष्ट्या अक्षम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 रविवारपासून कोलंबोमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान भारतीय संघ आपला पुढचा सामना इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. हा सामना सोमवारी खेळला जाईल. यानंतर भारतीय संघाचा पुढचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना बुधवारी (15 जानेवारी) खेळला जाईल. भारत-पाकिस्तान संघात आणखी एक सामना होणार आहे, जो (16 जानेवारी) रोजी खेळला जाईल. इंग्लंडशी भारताचा दुसरा सामना (1 जानेवारी) रोजी, तर श्रीलंकेशी दुसरा सामना होईल. या स्पर्धेचा फायनल सामना (21 जानेवारी) रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, या खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी
भारतीय संघानं मोडला 8 वर्ष जुना विक्रम, या खेळाडूनं ठोकलं करिअरचं पहिलं शतक
ऐकून विश्वास बसणार नाही! युवराज सिंगच्या वडिलांनी केली चक्क धोनीची प्रशंसा; VIDEO व्हायरल