भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून भारत विरुद्ध लिसेस्टरशायर यांच्यात सराव सामना सुरू आहे. लिसेस्टर येथे सुरू असलेला सामना चार दिवस खेळला जाणार आहे. गुरूवारी (२३ जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारताचे काही खेळाडू लिसेस्टरशायरकडून खेळत आहेत. या सामन्यातील तिसऱ्या डावात आयपीएलपासुन सुर न गवसलेला भारताचा नुकताच कर्णधार झालेला रोहित शर्मा हा सराव सामन्याच्या पहिल्या डावात चांगली कामगिरी करु शकला नाही आणि आता कोविड पॉसिटीव सापडला आहे. अशातच आता भारताच्या अडचणीमध्ये भर पडली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये होणार असलेल्या एकमात्र कसोटी सामन्याची वेळ देखील बदलवण्यात आली आहे.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, भारतीय वेळेच्या अनुसरुन आता एजबॅस्टन येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याची वेळ नियमित वेळ बदलली आहे. आतापर्यंत सामना सुरु होण्याची वेळ ही भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजताची होती तर ती आता आर्धा तास आधी म्हणजेच दुपारी ३ वाजेची केली गेली जाऊ शकते. याचाच अर्थ सामन्याच्या दिवसाचा पहिला चेंडू हा भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता फेकला जाईल. त्याचबरोबर दिवसाचा खेळ १० वाजता संपवण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर निर्धारित वेळेत दिवसाचे ठरावीक ९० षटके पुर्ण टाकली गेली नाही तर अर्धा तासाचा अतिरिक्त वेळ संघाना दिला जाईल.
याचमुळे जो संघ आधी गोलंदाजी करेन त्याला या गोष्टीचा फायदा घेता येईल. कारण हवेतील नमीमुळे गोलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे फलंदाजाना अडचणीत आणण्यासाठी गोलंदाज प्रयत्नशील असतील. तसेच फलंदाजाना अशावेळी फलंदाजी करणे फार कठीण जाईल. आणि अशात केएल राहुल आणि रोहित यांच्या अनुपस्थितीत जर भारतीय संघाचे वरच्या फळी कमकुवत दिसत आहे. अशा वेळी भारतीय संघाला हा अजुन एक धक्काच बसण्यासारखे आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध लिसेस्टरशायर यांच्यात सुरू असलेल्या सराव सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, रिषभ पंत आणि केएस भरत यांनी चांगली खेळी करत अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर जडेजा आणि श्रेयस अय्यर यांनी देखील अर्धशतके केली मात्र त्यासाठी त्यांना ३-३ वेळा फलंदाजी करावी लागली. तर रोहित शर्मा हा दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ‘या’ कारणामुळे वागतात खडूसपणे, दिग्गजाची आहे शिकवण
पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने रचला मोठा विक्रम; मोठ-मोठे खेळाडू पडले मागे
जगात ५००० पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच