कार्डिफ। आज(28 मे) भारताचा बांगलादेश विरुद्ध विश्वचषकापूर्वीचा दुसरा सराव सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 359 धावा केल्या आहेत. भारताकडून एमएस धोनी आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केल्या आहेत.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. बांगलादेशने गोलंदाजीची सुरुवातही चांगली केली होती. त्यांना भारताच्या रोहित शर्मा(19) आणि शिखर धवन(1) या सलामीवीरांच्या जोडीला लवकर बाद करण्यात यश आले होते.
पण नंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि राहुलने भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतू काही वेळातच 47 धावांवर विराट बाद झाला. त्याच्यानंतर विजय शंकरनेही 2 धावांवर विकेट गमावली.
त्यामुळे भारताची स्थिती 4 बाद 102 धावा अशी झाली. पण त्यानंतर राहुल आणि एमएस धोनीने भारताचा डाव सावरत पाचव्या विकेटसाठी 164 धावांची दिडशतकी भागीदारी रचली आणि भारताला भक्कम स्थितीत उभे केले.
या दोघांची भागीदारी सब्बीर रेहमानने राहुलला बाद करत तोडली. राहुलने 99 चेंडूत 108 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर काही वेळानंतर आक्रमक खेळणार हार्दिक पंड्या 11 चेंडूत 21 धावांची छोटेखानी खेळी करुन बाद झाला.
तर धोनीला शेवटच्या षटकात शाकिब अल हसनने त्रिफळाचीत केले. धोनीने या डावात 78 चेंडूत 113 धावांची खेळी केली. ही खेळी करताना त्याने 8 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली.
अखेर दिनेश कार्तिक(7*) आणि रविंद्र जडेजाने(11*) काही आक्रमक फटके मारत भारताला 350 ची धावसंख्या पार करुन दिली.
बांगलादेशकडून रुबेल हुसेन आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान, मोहम्मद सैफुद्दीन आणि सब्बीर रेहमानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या गमतीशीर कारणामुळे कोहलीचे विश्वचषक जिंकणे कठीण, वाचा काय आहे ते कारण
–२०१९ विश्वचषक विजेतेपदासाठीच्या प्रबळ दावेदाराबद्दल महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो…
–धोनीच्या टिकाकारांना ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुनावले खडेबोल






