इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून आयसीसीच्या १२व्या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी इंग्लंड आणि भारत हे प्रबळ दावेदार असल्याचे अनेक दिग्गजांनी म्हटले आहे. त्यानुसार जर हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला तर एक खास आणि गमतीशीर विक्रम विराट कोहलीच्या नावावर होणार आहे.
आत्तापर्यंत ज्या कर्णधारांनी वनडे विश्वचषक जिंकले आहेत त्यातील एकाही कर्णधाराला विश्वचषक जिंकण्याच्यावेळी दाढी नव्हती. त्यामुळे आता जर विराटने हा विश्वचषक जिंकला आणि त्याने त्याची दाढी ठेवली तर तो दाढी ठेऊन विश्वचषक जिंकणारा पहिलाच कर्णधार ठरेल.
पण जर दाढी नसलेल्या कर्णधाराने विश्वचषक जिंकण्याची परंपरा कायम राहिली तर मात्र यावेळी इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरला चांगली संधी आहे.
कारण यावर्षी कर्णधार असलेल्या खेळाडूंपैकी होल्डर आणि मॉर्गन व्यतिरिक्त सर्व कर्णधारांना थोडी तरी दाढी आहे. त्यातही विराट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मोठी दाढी ठेवली असल्याचे लक्षात येत आहे.
त्यामुळे आता दाढी नसलेल्या कर्णधाराने विश्वचषक जिंकण्याची परंपरा कायम राहते की विराट किंवा विलियम्सन ही परंपरा मोडीत काढणार हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आजपर्यंत झालेल्या ११ आयसीसी विश्वचषकात ज्या संघांनी विश्वचषक जिंकला त्यातील एकही कर्णधाराला दाढी नव्हती. यावेळी इतिहास नव्याने लिहीला जाणार का? #म #मराठी #CWC2019 #cwc19 @aparanjape pic.twitter.com/Wndm9osIGk
— Sharad Bodage (@SharadBodage) May 28, 2019
या कर्णधारांनी जिंकले आहेत विश्वचषक –
क्वाईव्ह लॉईड (1975 आणि 1979, विंडीज)
कपिल देव (1983, भारत)
ऍलेन बॉर्डर (1989, ऑस्ट्रेलिया)
इम्रान खान (1992, पाकिस्तान)
अर्जूना रणतुंगा (1996, श्रीलंका)
स्टिव्ह वॉ (1999, ऑस्ट्रेलिया)
रिकी पॉटिंग (2003 आणि 2007, ऑस्ट्रेलिया)
एमएस धोनी (2011, भारत)
मायकल क्लार्क (2015, ऑस्ट्रेलिया)
2019 – ??
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०१९ विश्वचषक विजेतेपदासाठीच्या प्रबळ दावेदाराबद्दल महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो…
–धोनीच्या टिकाकारांना ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुनावले खडेबोल




