सध्या क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या एका युवा फलंदाजाने इतिहास रचला आहे. या युवा फलंदाजाने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारत अविस्मरणीय अशी कामगिरी केली आहे. वामशी क्रिष्णा अशा या फलंदाजाचं नाव आहे. वामशी याने कर्नल सी के नायडू स्पर्धेत रेल्वे विरुद्ध हा कारनामा केला आहे. वामशीने एका ओव्हरमध्ये फटकावलेल्या 6 सिक्सचा व्हीडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे.
याबरोबरच, वामशी क्रिष्णा याने रेल्वे टीमचा स्पिनर दमनदीप सिंह याच्या बॉलिंगवर हा धमाका केला. वामशीने रेल्वे विरुद्ध या 6 षटकारांच्या जोरावर झंझावाती अशी शतकी खेळी केली. वामशीने 64 बॉलमध्ये 110 धावा केल्या. वामशीने या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वामशीने रेल्वेच्या गोलंदाजांना झोडून काढला. वामशीच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता.
कृष्णाच्या या दमदार प्रदर्शनानंतरही आंध्र प्रदेशच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 378 धावा केल्या होत्या. तर या उलट रेल्वेने पहिल्या डावात डोंगराएवढी धावसंख्या उभारली होती. तसेच त्यांनी 9 विकेट गमावून 865 धावा केल्या होत्या. रेल्वेकडून अंश यादवने 268 आणि रवी सिंहने 258 धावा केल्या होत्या. रेल्वेने पहिल्या डावाच्या आधारावर आंध्र प्रदेशवर 487 धावांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला आहे.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1760262831402799228
दरम्यान आतापर्यंत क्रिकेट इतिहासात एका ओव्हरमध्ये मोजक्याच फलंदाजांना जमलं आहे. आतापर्यंत अशी कामगिरी हर्षल गिब्स, जसकरण मल्होत्रा, युवराज सिंग, कायरन पोलार्ड, गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, ली जर्मन, थिसारा परेरा, ऋतुराज गायकवाड, रोज व्हाइटली, लिओ कार्टर आणि हजरतुल्ला झझाई या फलंदाजांनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा कारनामा केला आहे.
महत्वाच्या बातम्या –






