जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) मंगळवारी जाहीर केले की, भारत 2026 साली बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करेल. भारताला 2023 मध्ये सुदीरमन चषकचे आयोजन करायचे होते. परंतु, बीडब्ल्यूएफने या जागतिक मिश्र संघ अजिंक्यपदचे यजमानपद चीनकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील कोरोनाची परिस्थिती पाहता यावर्षीचा बीडब्ल्यूएफने चीनच्या शुजोऊऐवजी फिनलँडच्या वांता येथे सुदीरमन कप आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीडब्ल्यूएफने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “शुजोऊ आता 2023 मध्ये बीडब्ल्यूएफ जागतिक मिश्र संघ अजिंक्यपदचे आयोजित करणार आहे, यापूर्वी भारतामध्ये आयोजन करण्यात येणार होते. 2026 सालाामध्ये भारताने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यास स्विकारले आहे.”
जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्याची ही भारताची दुसरी वेळ असेल. यापूर्वी भारताने 2009 मध्ये बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे हैदराबाद येथे आयोजन केले होते. तर आता दुसऱ्यांदा 2026 मध्ये या जागतिक स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांनी आपली प्रतिक्रिया दिली की, “जागतिक अजिंक्यपदसारख्या स्पर्धेचे आयोजन करणे हे खरोखरंच देशासह बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियासाठी एक खूप मोठी संधी आहे.”
ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत असलेली पीव्ही सिंधू ही सध्या महिला एकेरीची विश्वविजेतेपदाची दावेदार आहे. या स्पर्धेत यापूर्वी सिंधूने दोन रौप्य व दोन कांस्यपदके ही जिंकली आहेत. स्वित्झर्लंडच्या बासेल येथे पुरुष एकेरीत जागतिक अजिंक्यपदमध्ये पदक बी साई प्रणितने जिंकले. प्रणितने दोन वर्षांपूर्वी हे विजेतेपद जिंकून 36 वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. साल 2015 आणि 2017 मध्ये सायना नेहवालने अनुक्रमे रौप्य व कांस्य हे दोन्ही पदके जिंकले आहेत. तर 2011 मध्ये लंडन येथे महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टा या दोघींनी ही कांस्यपदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ईशांत शर्माला गोल्फ खेळताना पाहून युवराज सिंगने घेतली त्याची फिरकी; म्हणाला, ‘लंबू जी, जरा…’
आयपीएल की पीएसएल, कशाची निवड करशील? शोएब अख्तरने दिले भन्नाट उत्तर