विश्वचषक 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा अखेरचा म्हणजेच 45वा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय आणि नेदरलँड्स दोन्ही संघात कोणताही बदल झाला नाहीये.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहायची झाली, तर भारतीय संघ आघाडीवर आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 8च्या 8 सामन्यात विरोधी संघांना पराभवाची धूळ चारली आहे. या विजयांनंतर भारत 16 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. आता भारताला आपला अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवून भारत साखळी फेरीत अजिंक्य राहण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, नेदरलँड्स संघाविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यातील 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, उर्वरित 6 सामन्यात पराभव पत्करला आहे. हे दोन विजय त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध मिळवले आहेत. अशात स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्स संघ काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (India have won the toss and have opted to bat against netherlands)
विश्वचषक 2023 स्पर्धेतील 44व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
नेदरलँड्स
वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
हेही वाचा-
‘दरदिवशी 50 धावा खर्चून सामनावीर पुरस्कार मिळत नाही’, मिचेल मार्शचे खळबळजनक विधान
सेमीफायनलचा पत्ता कट होताच इंग्लंड ‘या’ देशाविरुद्ध खेळणार वनडे अन् टी20 मालिका; संघ घोषित, पण कर्णधार कोण?