---Advertisement---

शेवटच्या टी२० सामन्यात रोहित शर्मा करणार नेतृत्व, टीम इंडियात झाले हे बदल

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पाचवा आणि शेवटचा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने 1 बदल केला आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आज भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितला चौथ्या टी20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. पण आता आज विराटने विश्रांती घेतल्याने रोहितचे पुनरागमन झाले आहे. हा एकमेव बदल भारताच्या 11 जणांच्या संघात झाला आहे.

तसेच चौथ्या टी20प्रमाणेच आजच्या सामन्यातही सलामीला फलंदाजीसाठी केएल राहुलसह संजू सॅमसन उतरेल. तर रोहित विराट ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

याबरोबरच चौथ्या टी20प्रमाणे आजही न्यूझीलंडचे नेतृत्व टीम साऊथी करणार आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन खांद्याच्या दुखापतीचा सामना करत असल्याने तो खेळणार नाही. तो या दुखापतीमुळे चौथ्या टी20 सामन्यातही खेळला नव्हता.

या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्या चारही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ आजचा शेवटचा सामना जिंकून निर्विवाद वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड समोर आजचा टी20 सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असेल.

पाचव्या टी20 सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – संजू सॅमसन, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, टॉम ब्रूस, रॉस टेलर, टिम सेफर्ट, डॅरिल मिशेल, मिशेल सॅंटनर, स्कॉट कुग्लेइझन, टीम साऊथी (कर्णधार), ईश सोधी, हमीश बेनेट.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---