रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये विश्वचषक 2023 स्पर्धेतील 21व्या सामन्यासाठी आमने-सामने आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकत दोन्ही संघ विश्वचषकातील विजयाचा पंच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात भारतीय संघातून हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना बाहेर केले आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघात कोणताही बदल झाला नाहीये.
स्पर्धेतील कामगिरी
भारत आणि न्यूझीलंड संघांची स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर दोन्ही संघ एकाच नावेत आहेत. म्हणजेच, दोन्ही संघांनी आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र, चांगल्या नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंड संघ (+1.923) पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी, तर भारतीय संघ (+1.659) दुसऱ्या स्थानी आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने अफगाणिस्तानला 8 विकेट्सने, तर अनुक्रमे पाकिस्तान आणि बांगलादेशला प्रत्येकी 7 विकेट्सने पराभूत केले होते. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला 9 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी नेदरलँड्सला 99 धावांनी नमवले. तसेच, तिसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने आणि चौथ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 149 धावांनी विजय मिळवला.
अशात दोन्ही संघ हा सामना जिंकत आपला विजयीरथ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील.
आमने-सामने कामगिरी
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात विश्वचषकात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे दिसते. न्यूझीलंडने सर्वाधिक 5 सामने जिंकले आहेत. तसेच, भारताने फक्त 3 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, भारताने न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकातील अखेरचा सामना 2003मध्ये जिंकला होता. (India have won the toss and have opted to field against new zealand)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड-
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
हेही वाचा-
कहर! WBBLमध्ये ‘या’ खेळाडूने फक्त 23 चेंडूत चोपल्या 114 धावा, चौकार-षटकारांच्या पावसात बॅटही तुटली
IND vs NZ सामन्यापूर्वी दिग्गजाच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष; हार्दिक पंड्याचे महत्त्व सांगत म्हणाला…