Loading...

पुणे कसोटीसाठी अशी आहे ११ खेळाडूंची टीम इंडिया!

पुणे। आजपासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. भारतीय संघाने हनुमा विहारीच्या जागी उमेश यादवला संधी दिली आहे.

त्यामुळे भारतीय संघात आता मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश असे तीन वेगवान गोलंदाज असतील. तर आर अश्विन आणि रविंद्र जडेजावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल.

Loading...
Loading...

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या 11 जणांच्या संघात एन्रीच नोर्जेला डेन पायड्तच्या ऐवजी संधी दिली आहे.

या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी आहे. तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याची दक्षिण आफ्रिकेला संधी आहे. याआधी विशाखापट्टणमला झालेला पहिला कसोटी सामना भारतीय संघाने 203 धावांनी जिंकला आहे.

पुणे कसोटीसाठी असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत –

मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी.

दक्षिण आफ्रिका – 

डीन एल्गार, एडेन मार्करम,थेउनिस डी ब्र्यून, तेंबा बावुमा, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सेनुरान मुथुसामी, वर्नोन फिलँडर, केशव महाराज, कागिसो रबाडा, एन्रीच नोर्जे.

Loading...
You might also like