ऑलम्पिक २०२० मध्ये भारतीय पुरुष संघाने ५ ऑगस्टला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला तब्बल ४० वर्षे वाट पहावी लागली होती. भारतीय संघाने जर्मनीला ५-४ अशा फरकाने हरवत पदकावर आपले नाव कोरले. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय हॉकी संघ या क्षणाची वाट पाहत होता. अखेर तो क्षण आला आणि भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले.
प्रत्येक खेळाडूने भारताच्या विजयात मोलाची भूमिका साकारली होती. त्यातीलच एक म्हणजे पूर्व कर्णधार आणि जगातील उत्कृष्ट गोलकीपर पैकी एक पीआर श्रीजेश.
श्रीजेशसाठी यंदाचे ऑलिंपिक खूप महत्त्वाचे होते. कारण यंदाचे ऑलम्पिक श्रीजेशचे शेवटचे ऑलम्पिक होते आणि श्रीजेशचे देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
The Boss………… Sreejesh pic.twitter.com/rYvZnROFdg
— Sanjeev Sanyal (@sanjeevsanyal) August 5, 2021
सध्या श्रीजेशचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात सामन्यानंतर श्रीजेश गोलपोस्टवर बसलेला दिसतो आहे.
याबाबत तो म्हणाला, “माझे संपूर्ण आयुष्य गोलपोस्टवरच व्यतीत झाले आहे. गोलपोस्टच माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझ्यासाठी ही जागा खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या फोटोद्वारे मला हे सांगायचे होते की या गोलपोस्टचा मीच मालक आहे.”
This picture is worth a Billion Respects
P R #Sreejesh
Jai Hind ???????? pic.twitter.com/Cp7Ej2aiZS— ShikhaRai ???????? (@mahifangirl07) August 5, 2021
श्रीजेश तसा शांत स्वभावाचा आहे. सामना जिंकल्यानंतर फार क्वचितच वेळा विजय साजरा करताना दिसतो. मात्र यावेळी त्याच्यासाठी हा विजय खूप महत्वाचा होता. त्यामुळे त्याने अशा प्रकारे आपला विजय साजरा केला.
२१ वर्षांचा अनुभव आला कामी
मी गेल्या २१ वर्षांपासून हॉकी खेळतो आहे. मला डोळ्यासमोर एकच चित्र दिसत होते ते म्हणजे भारतीय संघाचा विजय. यासाठी मी माझ्या २१ वर्षांचा अनुभव त्यात झोकून दिला. जेव्हा शेवटची पेनल्टी होती, तेव्हा मी स्वतःला एकच सांगत राहिलो काहीही करून पेनल्टी वाचवायची आहे. माझा २१ वर्षांचा अनुभव आज माझ्या कामी आला. श्रीजेशने उत्तम कामगिरी करत आतापर्यंत अनेक वेळा भारतीय संघासाठी गोल वाचवले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–दिपक पुनियाच्या हातून निसटले ‘कांस्य’, रोमांचक सामन्यात झाला पराभूत
–विराटने वाईट दिवसांची काढली आठवण; म्हणाला, ‘कठीण काळात सचिनला मदत मागितली आणि…’
–टोकियो ऑलिंपिकमधील रवी दहियाच्या सोनेरी कामगिरीचा ग्रामस्थांकडून जल्लोष, गावभर केला दीपोत्सव






