क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.5 षटकात 5 विकेट्स राखून भारताचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी अंतिम सामन्यात पोहोचण्याची समीकरणे काय आहेत?, याबद्दल जाणून घेऊ..
भारतासाठी कठीण बनली अंतिम सामन्याची समीकरणे?
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भारताला त्यांचे सुपर-4 फेरीतील दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. जर भारताने दोनपैकी एकही सामना गमावला, तर त्यांच्यावर आशिया चषकातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकते. भारतीय संघाचा पुढील साखळी फेरी सामना श्रीलंकाविरुद्ध 6 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध 8 सप्टेंबर भारतीय संघ दोन हात करेल.
श्रीलंकेने त्यांचा सुपर-4 फेरीतील अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. अशात जर भारताने त्यांना हरवले आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांनी विजयश्री प्राप्त केली, तर त्यांचे आणि पाकिस्तानचे 4 गुण होतील. दुसरीकडे जर पाकिस्तानने अफगाणिस्तानला हरवले, तर तिन्ही संघांचे 4-4 गुण होतील. अशात टॉप-2 संघांचा निर्णय त्यांच्या रन रेटनुसार ठरेल.
पाकिस्तानने उर्वरित सर्व सामने जिंकल्यास भारताला फायदा
रोहित शर्मा आणि संघ पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करू शकते. जर पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि श्रीलंकाविरुद्धचे राहिलेले दोन्हीही सामने जिंकले, तरीही भारताला फायदा होऊ शकतो. परंतु त्यासाठी भारताला त्यांचे राहिलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. असे झाल्यास, पाकिस्तानचा संघ सर्वाधिक 6 गुणांसह अंतिम सामन्यात पोहोचेल. भारतीय संघ 4 गुणांसह अंतिम सामन्यात जाईल. तर श्रीलंका 2 आणि अफगाणिस्तान शून्य गुणांसह स्पर्धेतून बाहेर होईल.
एक सामना गमावल्यानंतरही भारताकडे संधी
याशिवाय जर पाकिस्तानने त्यांचे उरलेले दोन्हीही सामने जिंकले, तर ते थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतील. दुसरीकडे जर भारतीय संघाने श्रीलंकेला हरवले आणि अफगाणिस्तानकडून पराभूत झाले, तर तिन्ही संघांचे 2-2 गुण होतील. अशात नेट रन रेटवर अंतिम सामन्यातील दुसरा संघ ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चोरांच्या उलट्या बोंबा! अर्शदीपवर चिडला, पण कॅप्टन रोहितने स्वतःच दुसऱ्यांदा केली ‘ही’ मोठी चूक
एका कॅचमुळे खलनायक ठरलेल्या अर्शदीपची विराटकडून पाठराखण; म्हणाला, ‘दबावात कोणा…’
हार्दिक अन् पंतवर खूपच तापला कर्णधार रोहित, ड्रेसिंग रूममध्ये संगठच काढला ‘जाळ अन् धूर’