भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind test series) यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियावर खेळला जात आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खास नव्हती. परंतु गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या प्रदर्शनमुळे भारताने सामन्यात पुनरागमन केले. असे असेल तरीही, भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) सामन्याच्या पहिल्या डावात फक्त एक विकेट घेऊ शकला. दरम्यान बुमराहचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ अपेक्षित धावसंख्या गाठू शकला नाही. परंतु दक्षिण अफ्रिकेपाठोपाठ भारतीय गोलंदाजांनी देखील खेळपट्टीवर अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. जसप्रीत बुमराहने देखील एका विकेटचे योगदान दिले. सामन्याच्या पहिल्या दिवशी बुमराह एकही विकेट घेऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याने एक विकेट घेतली आणि यादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज बुमराह फिरकी गोलंदाजी करताना पाहिला गेला. भारतीय दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) ज्याप्रकारे गोलंदाजी करतो, बुमराह तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. एकीकडे भारतीय संघातील इतर गोलंदाज जेव्हा सराव करत होते, तेव्हा दुसरीकडे बुमराह अश्विनची नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. बुमराहचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांनी चालू सामन्यात बुमराहने फिरकी गोलंदाजी करावी, अशी मागणी देखील केली आहे.
https://youtu.be/-ukMweY2-k4
https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1478282615283015682?s=20
दरम्यान, उभय संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिका संघ देखील २२९ धावांवर गुंडाळला गेला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली.
गोलंदाजांमध्ये पहिल्या डावात भारताच्या शार्दुल ठाकुरने १७.५ षटकात ६१ धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमीने ५२ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. तर बुमराहने एक विकेट घेण्यासाठी ४९ धावा खर्च केल्या.
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडला मायभूमीत पराभवाचा धक्का देत बांगलादेश संघाचे धांसू सेलिब्रेशन, ‘हे’ गाणे गात जिंकले मन
SAvsIND, 2nd Test, Live: लंचब्रेकपर्यंत भारताकडे १६१ धावांची आघाडी, ६ फलंदाज परतलेत तंबुत
लाईव्ह सामन्यादरम्यान विराटची दक्षिण आफ्रिकेच्या डगआऊटमध्ये जाऊन खेळाडूंशी चर्चा, व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ पाहा –