भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला. भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या या विजयानंतर आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची क्रमवारी अगदी रंजक बनली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला आता अवघा एक विजय मिळवावा लागेल.
Ravindra Jadeja ran through Australia as the visitors collapsed incredibly in the morning session 💥
How Day 3 panned out 👇https://t.co/4wPVkboxd1
— ICC (@ICC) February 19, 2023
नागपूर कसोटी सहज जिंकल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात थोडासा संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना पीटर हॅंड्सकॉम्ब व उस्मान ख्वाजा यांच्या खेळाच्या जोरावर 263 धावा उभ्या केलेल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर गडगडल्याने भारतासमोर विजयासाठी 115 धावांचे आव्हान राहिले. भारतीय संघाने चार गडी गमावत हे आव्हान पार केले. सामन्यात दहा बळी मिळवणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.
या विजयानंतर भारतीय संघाचे जागतिक क्रमवारीतील दुसरे स्थान आणखी भक्कम झाले आहे. या विजयानंतर भारताच्या गुणांची टक्केवारी 64.06 इतकी झाली आहे. मात्र, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारताचे स्थान अद्याप पक्के झाले नाही. भारताला पुढील दोन पैकी एका कसोटीत विजय मिळवावा लागेल. सध्या ऑस्ट्रेलिया या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय संघाच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर झाला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीआधी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका ही दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल. या मालिकेत श्रीलंकेने 2-0 असा विजय मिळवले असते अंतिम फेरीसाठी आपली दावेदारी कायम ठेवतील. मात्र तत्पूर्वी, भारताने ऑस्ट्रेलियाला 4-0 असे पराभूत करणे गरजेचे आहे.
(India Inch Closer To Qualify For WTC Final After Delhi Test Win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजाराला ऑस्ट्रेलियन संघातर्फे 100 व्या कसोटीची ‘स्पेशल गिफ्ट’! खिलाडूवृत्तीने जिंकली मने
केएल राहुलला पुन्हा मिळाली कसोटीत संधी, चाहते म्हणताय….