मुंबई | आज जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखताना दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेला तब्बल १३ गुणांनी मागे टाकले आहे.
२०१४-१५ या काळात खेळलेल्या कसोटी सामन्यांचे निकाल क्रमवारीतून काढून टाकत आयसीसीने आज नविन क्रमवारी जाहीर केली. तसेच यात २०१५-१६ तसेच २०१६-१७ या वर्षातील कामगिरीला ५०% मह्त्त्व देण्यात आले आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबर दुसऱ्या क्रमांवरील फरक हा ४ गुणांची कमाई करत आता १३वर नेला आहे. त्यामुळे भारताचे आता १२५ गुण झाले आहेत तर दक्षिण आफ्रिकेला ५ गुणांचा फटका बसला आहे.
असे असले तरी दुसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेत (११२) आणि तिसऱ्या स्थानावरील आॅस्ट्रेलियामध्ये (१०६) ६ गुणांचा फरक आहे.
https://twitter.com/Maha_Sports/status/991314316807884801
गमतीचा भाग म्हणजे ३ एप्रिल रोजी आॅस्ट्रेलियाकडून तिसरे स्थान काबीज करणाऱ्य़ा न्यूझीलंडला आपले हे स्थान पुन्हा गमवावे लागले आहे. परंतू तेव्हा ते स्थान मिळवल्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकाची २ लाख डाॅलर बक्षिस मिळाले होते. कारण आयसीसीच्या बक्षिसासाठी असलेल्या कट आॅफ डेला ते तिसऱ्या स्थानावर होते.
दुसरा गमतीचा भाग म्हणजे बांगलादेश इतिहासात प्रथमच आयसीसी क्रमवारीत ८व्या स्थानी गेला आहे. त्यांनी विंडीडला मागे टाकत हे स्थान काबीज केले आहे.
आयसीसी दरवर्षी नव्याने वार्षिक क्रमवारीचा आढावा घेते. त्यामुळे संघांच्या क्रमवारीत मोठ्या प्रमाणार बदल होतात.
महत्त्वाच्या बातम्या –
–एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री!
–क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…
–आज चुकीला माफी नाही, पराभूत संघासाठी पुढचा प्रवास खडतर
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद
–धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!
–मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल