गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारतीय संघाला इंग्लंडकडून लाजिरावाण्या पराभवाचा सामना करावा लागला. टी-20 विश्वचषक 2022 चा हा उपांत्य सामना होता, जो एडिलेड ओव्हल मैदानात पार पडला. इंग्लंडने तब्बल 10 विकेट्सच्या अंतराने भारताला पराभूत केले आणि अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ ठरला. आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. पराभवानंतर भारतीय संघावर सर्वत्र टीका होताना दिसत आहे. आता इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन देखील या टीकाकारांच्या यादीत सहभागी झाले आहेत.
मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी ‘द टेलिग्राफ’साठी लिहिलेल्या लेखात भारतीय संघावर सडकून टीका केली. त्यांनी लिहिले की, “50 षटकांचा (एकदिवसीय) विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी काय केले आहे. काहीच नाही. भारत इतिहासातील सर्वात अंडर-परफॉर्मिंग (क्षमता असूनही सर्वात खराब प्रदर्शन करणारा) संघ आहे. जगातील कोणताही खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी जातो, तेव्हा म्हणतो की, त्याचा खेळ सुधारला. मात्र, भारतीय संघाला आयपीएलपासून काय फायदा मिळाला.”
“मी या गोष्टीने हैराण आहे की, ते टी-20 क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने खेळत आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, पण त्यांच्याकडे त्यांच्याकडे क्रिकेट खेळण्याची पद्धत नाहीये. त्यांनी स्वतःची प्रोसेस सुधारावी लागेल. ते विरोधी संघाच्या फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये वेळ देतात तरी कशासाठी?,” असाही प्रश्न वॉनने पुढे उपस्थित केला आहे.
लेखात वॉनने पुढे लिहिले की, “भारतीय संघावर टीका केल्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही शिकार बनू शकता. तसेच तुम्ही भारतीत काम देखील गमावू शकता. पण ही वेळ योग्यते बोलण्याची आहे. त्यांच्याकडे गोलंदाजीचे पर्याय मर्यादित आहेत. फलंदाजीत देखील डेफ्त नाहीये. फिरकी गोलंदाज देखील खूप कमी बदल करताना दिसतात.”
दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील उपांत्य सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य अवघ्या 16 षटकांमध्ये आणि एकही विकेट न गमावलता विजय मिळवला. (india is most-under-performing-team says Michael Vaughan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड मालिका रंगणार, ‘हे’ सात खेळाडू मात्र धरणार मायदेशाची वाट
खरा बाजीगर! तीन वर्षांपूर्वी विलन ठरलेला हेल्स आज इंग्लंडला फायनलमध्ये घेऊन गेला