क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंगळवारी बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या आयसीसीच्या वार्षिक अधिवेशनादरम्यान बीसीसीआयने मेगा-टूर्नामेंटसाठी बोली जिंकल्यामुळे २०२५मध्ये भारत महिलांच्या ५० षटकांच्या विश्वचषकाचे आयोजन करेल. यासाठीचे वेळापत्रक नुकतेच आयसीसीकडून जारी करण्यात आले आहे.
एका दशकानंतर भारताला विश्वचषक आयोजित करण्याची संधी मिळाली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) या महत्त्वाकांक्षी स्पर्धेचे देश एका दशकाहून अधिक काळानंतर पुन्हा यजमानपद भूषवणार आहे. महिलांचा ५० षटकांचा विश्वचषक शेवटचा २०१३मध्ये भारतात झाला होता. या विश्वचषकात मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजचा ११४ धावांनी पराभव करून चॅम्पियन बनला.
भारतातील २०२५ विश्वचषकाव्यतिरिक्त, इतर तीन आयसीसी महिला स्पर्धांच्या यजमानांची घोषणाही करण्यात आली. ज्यामध्ये २०२४ टी-२० विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार आहे. २०२६ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे. श्रीलंका २०२७ टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.
बीसीसीआय अध्यक्षांनी आनंद व्यक्त केला
भारताला २०२५मध्ये महिला विश्वचषकाचे यजमानपद मिळाल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली: आम्ही आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५चे आयोजन करण्यास उत्सुक होतो आणि आम्हाला ते मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.
असा आहे महिला एकदिवसीय विश्वचषकाचा इतिहास
पहिला महिलांचा ५० षटकांचा विश्वचषक १९७३ मध्ये आयोजित करण्यात आला होता, १९७५ मध्ये इंग्लंडमध्ये पहिला पुरुष विश्वचषक होण्याच्या दोन वर्षांपूर्वी. भारताने १९७८, १९९७ आणि २०१३मध्ये तीनदा या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एवढे सामने खेळूनही शुभमनचे शतकं काय होईना! ‘ही’ आहे आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या
शुभमनचं शतक हुकलं! पण पठ्ठ्यानं थेटं केली सचिन अन् सेहवागची बरोबरी, पाहा काय आहे विक्रम
CWG 2022: पीव्ही सिंधू सलग दुसऱ्यांदा ध्वजवाहक, ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाचे करणार नेतृत्त्व