आशिया कप 2022 मध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू भारतात परतले आहेत. आशिया कप 2022 भारतीय संघासाठी चांगला गेला नाही. सुपर-4मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर संघ स्पर्धेतून बाद झाला. यानंतर सर्व खेळाडू भारतात परतले आहेत. आता संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळायची आहे.
भारतीय संघाला आता पुढील मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघही 3 टी-20 सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी तयारीसाठी भारताकडे आता हे 6 सामने शिल्लक आहेत. त्याचबरोबर विश्वचषकासाठी संघाचीही लवकरच घोषणा होऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडला भारताचा संघ, टीमबाहेर असलेल्या ‘या’ गोलंदाजाला संधी
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट






