बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND)यांच्यात पहिला वनडे सामना रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याचा हा निर्णय अतिशय योग्य ठरल्याचे दिसले, कारण भारताने सलामीवीर शिखर धवन याची विकेट 5.2 षटकात 23 धावसंख्येवर गमावली. भारताने पहिल्या चार विकेट 100च्या आतच गमावल्या.
सामना सुरू झाला असता भारताच्या शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी चांगली सुरूवात केली. रोहितने ताबडतोब फलंदाजी करत चौकार मारले. यामुळे भारत चांगला स्थितीत वाटत असताना मेहेदी हसन मिराज याने धवनला त्रिफळाचीत केले. धवन 7 धावा करत बाद झाला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास विराट कोहली (Virat Kohli) आला, मात्र त्यानेही निराशा केली. तो आणि रोहित एकाच षटकात बाद झाले. शाकिब अल हसन याचे ते 11वे षटक भारतासाठी धोकादायक ठरले. त्याने त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत रोहितला त्रिफळाचीत केले. रोहितने 31 चेंडूत 27 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार आणि एक षटकार मारला. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत विराट लिटन दास याला झेल देत बाद झाला. तो केवळ 9 धावा करत तंबूत परतला.
☝️ Rohit Sharma
☝️ Virat KohliTwo wickets in quick succession for Bangladesh ????
Follow the #BANvIND action ???? https://t.co/Ymfh2IDe14 pic.twitter.com/qOGZhPQUCV
— ICC (@ICC) December 4, 2022
न्यूझीलंड दौऱ्यात तुफानी फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो चांगला खेळत होता, मात्र विसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो इबादत होसेन याचा शिकार ठरला. अय्यरने 39 चेंडूत दोन चौकार मारताना 24 धावा केल्या. तो मुशफिकूर रहीमला झेल देत बाद झाला. यामुळे भारताने पहिल्या चार विकेट्स केवळ 92 धावसंख्येवरच गमावल्या.
या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचबरोबर विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याला संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर केले असून तो कसोटी मालिकेत संघपुनरागमन करणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीसारखाच शांत खेळाडू बनणार चेन्नईचा कर्णधार? बॅट्टींग कोचने केेले मत व्यक्त
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 18: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित आगरकर






