रायपूर। ‘वर्ल्ड रोड सेफ्टी सिरिज’ स्पर्धेत शनिवारी (१३ मार्च) इंडिया लिजंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लिजंड्स संघात सामना झाला. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अर्धशतकी खेळी केली. त्याने केलेली खेळी पाहून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत.
सचिनच्या स्ट्रेट ड्राइव्हची चर्चा
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंडिया लिजंट्सकडून सचिनने सलामीला फलंदाजी केली. यादरम्यान, पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सचिनने शानदार स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारत चौकार वसूल केला. हे, पाहून अनेकांना पूर्वीच्या सचिन तेंडुलकरची आठवण झाली.
त्याच्या स्ट्रेट ड्राईव्हचा व्हिडिओ अनेकांनी शेअर करत अजून काहीही बदललेले नाही, असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी १० वर्षांपूर्वी सचिनने स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा फोटो आणि शनिवारच्या सामन्यात स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा फोटो शेअर केला आहे.
Best Straight Drive ..
👇#RoadSafetyWorldSeries#SachinTendulkar pic.twitter.com/aUsQUnmpnA— Sunil Kumar 🇮🇳 (@sunil_k26) March 13, 2021
https://twitter.com/beinghuman_kash/status/1370760229265108994
https://twitter.com/kakashii_stan/status/1370732433461579779
There are few things never change.. #SRT’s straight drive is that one of few thing. Absolutely #nostalgia watching #SachinTendulkar and #YuvrajSingh bat like they used to bat #RoadSafetyWorldSeries2021 pic.twitter.com/U2jreLQx5Y
— Aditya Kulkarni (@imadityak) March 13, 2021
https://twitter.com/Arjunbs_/status/1370764465398972416
For legends age is just number @sachin_rt the GOAT what an innings that was 🙏🙏🔥🔥🔥🤯👌🙌#SachinTendulkar #RoadSafetyWorldSeriesOnVoot #roadsafetyworldseries pic.twitter.com/ucWgkrWLQn
— Subash (@AVSUBASH) March 13, 2021
Old memories hits once again after seeing #YuvrajSingh #Sachintendulkar batting pic.twitter.com/52IopZTyDj
— Satyam (@awaara_satyam) March 13, 2021
सचिनचे अर्धशतक
सलामीवीर विरेंद्र सेहवाग ६ धावांवर माघारी परतल्यानंतर सचिनने इंडिया लिजंट्सच्या फलंदाजीची जबाबदारी खांद्यावर घेत शानदार अर्धशतक झळकावले. यावेळी त्याने बद्रिनाथसह दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारीही रचली. सचिनने ९ चौकार आणि १ षटकारासह ३७ चेंडूत ६० धावांची खेळी केली.
The GOD still got it👑❤️❤️❤️🙏🏻🙌🏻
SACHINNNN SACHIN!@sachin_rt #SachinTendulkar pic.twitter.com/DQliuHMeGX— Paavan Trikha🇮🇳 (@paavantrikha) March 13, 2021
Master……..
King of cuts and drives……
Sachin….
Sachin……
47 years …
God for a reason 🙏🙏🙏🙏🙏#RoadSafetyWorldSeries2021 #SachinTendulkar pic.twitter.com/btiHDxEvWk— yaswanth_pokuri 🌊 (@Imyaswanth1) March 5, 2021
सचिन बाद झाल्यानंतर युवराजचेही अर्धशतक
सचिन बाद झाल्यानंतर बद्रीनाथ दुखापतग्रस्त होऊन ४२ धावांवर असताना मैदानातून बाहेर पडला. पण यावेळी युवराजने आक्रमक पवित्रा घेत २२ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे इंडिया लिजंट्सला २० षटकात ३ बाद २०४ धावा उभारल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉकडाऊनमध्ये ‘या’ गोष्टी केल्याने सुर्यकुमार राहिला फिट; तीन महिन्यात केले १२ किलो वजन कमी
भुतकाळात डोकावताना: ईडन गार्डन जळत होत आणि कांबळीसोबत सारा भारत रडत होता…