---Advertisement---

ऑस्ट्रेलिया लिजेंड्सला धूळ चारत सचिनची इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये, दोन दिवस चालला उपांत्य सामना

On: गुरूवार, सप्टेंबर 29, 2022 7:06 PM
India Legends
---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामना गाठला. सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वातील इंडिया लिजेंड्स संघाने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया लिजेंड्सला 5 विकेट्सने मात दिली. स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडीज लिजेंड्स आणि श्रीलंका लिजेंड्स यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात विजयी ठरणारा संघ आता अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सशी भिडेल. 

ऑस्ट्रेलियाला नाणेफेक गमावल्यानंतर सामन्यात पहिल्यांदाच फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया लिजेंड्सने 20 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंडिया लिजेंड्साठी सलामीवीर नमन ओझा याने नाबाद 90 धावा केल्या. ही संघासाठी केली गेलेली सर्वात मोठी खेळीही ठरली. या महत्वपूर्ण खेळीसाठी ओझाला सामनावीर देखील निवडले गेले. तसेच इरफान पठाण याने अवघ्या 12 चेंडूत 37 धावा केल्या.

उभय संघातील हा पहिला उपांत्य सामना बुधवारी  (28 सप्टेंबर) आयोजित केला गेला होता. परंतु पावसाने बाधा आणल्यामुळे त्यादिवशी खेळ पूर्ण होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने पाच विकेट्सच्या नुकसानावर 136 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवला गेला. पाऊस न थांबल्यामुळे पंचांना हा सामना राखीव दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबरला पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्या दिवसी ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 45 धावा केल्या आणि संघाजी धावसंख्या 171 पर्यंत पोहोचवली. रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी बेन डंकने सर्वाधिक 46 धावांचे योगदान दिले.

विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर भारताची सुरुवात चांगली झाली. पण कर्णधार आणि सलामीवीर सचिन तेंडुलकर 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. सुरेश रैना 8 चेंडूत 11, तर युवराज सिंग 15 चेंडूत 18 धावा करू शकला. स्टुअर्ट बिन्नी आणि युसूफ पठाण यांनी अनुक्रमे 2 आणि 1 अशी खेळी केली. परंतु शेवटच्या षटकांमध्ये इरफान पठाणच्या ताबडतोड खेलीच्या जोरावर संघाने विजय मिळवलाच. दरम्यान, स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (30 सप्टेंबर) आणि अंतिम सामना शनिवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जसप्रीत बुमराहच्या जागी टी20 विश्वचषकात ‘यांनाच’ घ्या! एक तर रिजर्वमध्येही नाही
बीसीसीआयचा ‘तो’ एक निर्णय टीम इंडियावर भारी, टी20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न राहणार अधुरेच! 
बिग ब्रेकिंग! भारताला मोठा धक्का, मुख्य वेगवान गोलंदाज टी20 विश्वचषकातून ‘आऊट’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---