विंडीज विरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात सामन्यात भारताला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. याविजयसह विंडीजने पिछाडी १-२ अशी भरून काढली आहे.
विंडीजने ५० षटकांत भारतासमोर १९० धावांचे लक्ष ठेवले. विंडीजच्या १८९ धावांत आघाडीच्या ५ फलंदाजांनी प्रत्येकी २० पेक्षा जास्त धावा केल्या. लेविस आणि होप या सलामीवीरांनी प्रत्येकी ३५ धावा करत विंडीजला ५७ धावांची सलामी दिली. ५० षटकांत ९ विकेट्सच्या बदल्यात विंडीजने १८९ धावा केल्या.
उमेश यादवने १० षटकांत ३६ धावा देत ३ विकेट्स तर हार्दिक पंड्याने १० षटकांत ४० धावा देत ३ टिकेट्स घेतल्या.
१९० धावांच लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारा शिखर धवन तिसऱ्याच षटकात ५ धावांवर बाद झाला. दुसरया बाजूने एकहाती किल्ला लढवत असणाऱ्या रहाणेला कुणाचीही विशेष साथ लाभली नाही. कर्णधार कोहली ३ धावांवर, दिनेश कार्तिक २ धावांवर बाद झाले. माजी कर्णधार धोनीने रहाणेच्या बाद झाल्यांनतर एका बाजूने खेळ करत भारताला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजूने कुणीही साथ न दिल्याने अखेर भारतीय डाव ४९.४ षटकांत १७८ धावांवर संपुष्ठात आला.
१० षटकांत २७ धावा देत ५ विकेट्स घेणाऱ्या जेसन होल्डरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
सध्या भारत दोन विजयसह मालिकेत २-१ असा आघाडीवर असून शेवटचा सामना ६ जुलै रोजी आहे.