---Advertisement---

‘चेन्नई कसोटीत वॉशिंग्टन सुंदरमुळे हार्दिक पंड्या बाकावर बसणार’, भारतीय दिग्गजाने वर्तविला अंदाज 

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 7:21 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिका सुरू होण्यास आता काही तासच शिल्लक आहेत. दोन्ही संघांमधील पहिला सामना हा चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेसाठी भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्याचे भारतीय संघात पुनरागमन आहे. हार्दिक ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी मालिकेचा भाग नव्हता.

या मालिकेत भारतीय संघासमोर अष्टपैलूच्या स्थानावर कोणाला संधी द्यायची, हा यक्षप्रश्न आहे. हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले असले तरी त्याला संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. याबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याचे म्हणणे आहे की वॉशिंग्टन सुंदरमुळे हार्दिक पंड्याला प्लेईंग इलेव्हन मध्ये जागा मिळणे, मुश्किल आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यामध्ये वॉशिंग्टन सुंदरने कमालीची खेळी खेळली होती. त्यामुळे हार्दिक पंड्यापेक्षा या खेळाडूला अधिक प्रमाणात पसंती दिली जाऊ शकते, असे इरफान पठाण म्हणाला.

वॉशिंग्टन सुंदरची कसोटी कारकीर्द पाहता त्याने आतापर्यंत फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. परंतु त्याने पदार्पणातच लक्ष वेधून घेतले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील गाबा कसोटी सामन्यात वॉशिंग्टनने दमदार केले होते. त्याने गाबा येथे पहिल्या डावात ६२ धावा आणि त्यानंतर दुसऱ्या डावात २२ धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने चार महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या.

२१ वर्षीय वॉशिंग्टन हा १९ वर्षाखालील संघात आघाडीच्या फळीतील स्पेशालिस्ट फलंदाज होता. त्याने आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीमध्ये सुधारणा करत भारतीय टी२० संघात स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणातील सामन्यात सातव्या क्रमांकावर सर्वोच्च धावा करणारा वॉशिंग्टन सुंदर हा फलंदाज ठरला. सुंदरने यासह राहुल द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली असून राहुल द्रविड नंतर पदार्पणातील सामन्यात सातव्या क्रमांकावर येत अर्धशतक ठोकणार सुंदर हा दुसरा खेळाडू ठरला.

द्रविडने १९९६ मध्ये कसोटी मध्ये पदार्पण केले होते. या पदार्पणातील सामन्यात ९५ धावांची खेळी केली होती. त्याच प्रमाणे टीम इंडियाच्या तीस वर्षांपूर्वीच्या भागीदारीचा विक्रम हा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन यांनी मोडीत काढला. याआधी टीम इंडियाकडून ब्रिस्बेन मध्ये सातव्या विकेटसाठी तीस वर्षापूर्वी १९९१ मध्ये ५८ धावांची सर्वोच्च भागीदारी करण्यात आली होती ही भागीदारी मनोज प्रभाकर आणि कपिल देव या जोडीने केली होती.

महत्वाच्या बातम्या:

इंडियन आयडल मधील या स्पर्धकाचा फॅन सेहवाग, ट्विट करत म्हणाला

स्टार्क नाही खेळणार बीबीएलचा अंतिम सामना, कारण ऐकून कराल कौतुक

गल्ली ते दिल्ली मराठमोळ्या रहाणेची चर्चा, संसदेत केले गेले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---