जपानची राजधानी टोकियो येथे नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. भारतीय पथकाने आत्तापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धांमध्ये केली. एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी एकूण सात पदके जिंकली. त्यानंतर आता टोकियो येथेच २४ ऑगस्टपासून दिव्यांग खेळाडूंच्या पॅरालिम्पिक स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. यावेळी भारतीय पथकामध्ये ५४ खेळाडूंचा सहभाग असून ते ९ विविध खेळांमध्ये सहभागी होतील. आज आपण या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आजवर केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
भारताने पटकावली आहेत इतकी पदके
भारतीय दिव्यांग खेळाडू १९६४ तेल अवीव पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. तेव्हापासून २०१६ रिओ पॅरालिम्पिकपर्यंत भारतीय खेळाडूंनी चार सुवर्ण, चार रौप्य व चार कांस्य पटकावली आहेत. विशेष म्हणजे यापैकी १० पदके ऍथलेटिक्समधील आहेत.
या खेळाडूंनी जिंकली आहेत पदके
१) मुरलीकांत पेटकर-
भारतासाठी पहिले पॅरालिम्पिक पदक १९७२ हडिलवर्ग पॅरालिम्पिकमध्ये मुरलीकांत पेटकर यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकलेले.
२) जोगिंदर सिंग बेदी-
भारतासाठी सर्वप्रथम एकापेक्षा जास्त पॅरालिम्पिक पदक जिंकण्याची कामगिरी जोगिंदर सिंग बेदी यांनी केली होती. १९८४ मेंडविले/न्यूयॉर्क पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी गोळाफेक प्रकारात रौप्य तर, थाळीफेक व भालाफेक प्रकारात प्रत्येकी कांस्य पदके मिळवले होती.
३) भीमराव केसरकर-
भालाफेकपटू भीमराव केसरकर यांनी १९८४ पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये L-६ प्रकारात रौप्यपदक आपल्या नावे केले होते.
४) देवेंद्र झांझरिया-
भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय ऍथलिट आहे. त्याने २००४ अथेन्स व २०१६ रिओ पॅरालिम्पिकमध्ये ही कामगिरी केलेली. त्याला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्रिक करण्याची संधी असेल.
५) राजेंदर सिंग राहेलू-
भारत्तोलनपटू राजेंदर सिंग राहेलू यांनी २००४ अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केलेली.
६) गिरीशा एन गौडा-
लंडन येथे झालेल्या २०१२ पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी एकमेव रौप्यपदक उंच उडी प्रकारात गिरीशा एन गौडा यांनी जिंकले होते.
७) वरूण भाटी-
रिओ पॅरालिम्पिकमध्ये वरूण याने उंच उडी प्रकारात कांस्यपदक आपल्या नावे केलेले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये त्याच्याकडून भारतीय पथकास पदकाची अपेक्षा आहे.
८) दिपा मलिक-
भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये जिंकणारी एकमेव महिला खेळाडू म्हणून दिपा मलिक यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी २०१६ रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
९) मरिय्यपन थंगावेलू-
मरिय्पनन थंगावेलू याने २०१६ रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये तो भारतीय पथकाचा ध्वजवाहक असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/fawad-alam-comeback-after-10-years-gap-and-scored-5-centuries/