टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. आता लवकरच टोकियो पॅरालंपिक खेळांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला येत्या २५ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने मन जिंकणारे वक्तव्य केले आहे.
भारतात क्रिकेटपटूंना सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलो केले जाते. इतर कुठल्याही खेळापेक्षा क्रिकेटला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे सचिन तेंडुलकरने चाहत्यांना विनंती केली आहे की, पॅरालंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढवा.
सचिन म्हणाला की, “आता टोकियो पॅरालंपिक स्पर्धा सुरू होणार आहे. मी सर्व भारतीयांना विनंती करतो को,टोकियोमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या ५४ खेळाडूंना समर्थन करा. मी आधीपासूनच असे समजतो की, हे पुरुष आणि महिला खेळाडू विशेष खेळाडू नाहीत तर, हे खेळाडू असामान्य क्षमता असलेले खेळाडू आहेत. हे आपल्या प्रत्येकासाठी वास्तविक जीवनातील नायक आहेत. ते आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “माझे आधीपासून असे म्हणणे आहे की, आपण जर पॅरालंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना तोच मान सन्मान दिला, जो आपण ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना आणि क्रिकेटपटूंना देतो. तर आपण समाजासाठी एक उत्तम उदाहरण ठरू शकतो. हे फक्त पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसाठीच मर्यादित नसावे, कारण ५४ खेळाडू पदक जिंकणार नाही. परंतु, सर्वांनी त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. आपण फक्त निकाल आल्यावरच नव्हे तर, या प्रक्रियेत देखील उत्साह साजरा करायला हवा. तरच आपल्या खेळात वास्तविक बदल घडेल.” (Sachin Tendulkar statement won the heart said give them respect like cricketers)
“या स्पर्धेत आपण १० पदक जिंकू शकतो. मला खात्री आहे की, आपण जिंकणार. रियो ऑलिम्पिकमध्ये आपण ४ पदकं जिंकले होते. जर आपल्याला १० पदक जिंकण्यात यश आले तर ही एक मोठी बाब असेल. ते खेळाडू जिंकले किंवा पराभूत झाले तरी मला प्रत्येक खेळाडूला समान नजरेने पाहायचं आहे. यापैकी प्रत्येक खेळाडू सर्वांसाठी एक आदर्श आहे. ते भारतासाठी जे करत आहे,ते पाहणे एक समाधानाची भावना आहे,” असे सचिन तेंडुलकर म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराटसेना जुन्या भारतीय संघासारखी नाही, ज्यांना कोणीही डिवचू शकत होते”
दहा वर्षानंतर पुनरागमन अन् १० सामन्यातच दाखवला जलवा, कामगिरी पाहून तुम्हालाही फुटेल घाम