बर्मिघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. मंगळवारी (२ ऑगस्ट) झालेल्या अंतिम फेरीत भारताने पुरुषांच्या सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले. हरमीत देसाईने एकेरीच्या सामन्यात विजय मिळवताच भारताचे सुवर्णपदक नक्की झाले होते. अखेरीस, भारताने अंतिम फेरीत सिंगापूरचा ३-१ असा पराभव करून विजेतेपद राखले. २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे सुवर्ण जिंकलेले. आता भारताने तिसऱ्यांदा सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे.
India win table tennis men's team????.
Achanta Sharath Kamal loses for the first time in the tournament but Harmeet Desai & G Sathiyan first partner to win doubles and then win their respective singles matches as ???????? beat Singapore 3-1 in the CWG 2022 to retain their????from 2018. pic.twitter.com/GeUqtvLLTx
— jonathan selvaraj (@jon_selvaraj) August 2, 2022
अशी रंगली अंतिम फेरी
संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीतही चांगली सुरुवात केली. भारतीय संघाने याआधीच गट फेरीत सिंगापूरचा ३-० असा पराभव केला होता. मात्र, अंतिम सामना पूर्णपणे वेगळा ठरला. भारतासाठी हरमीत देसाई आणि जी साथियान या जोडीने दुहेरीचा सामना ३-० असा जिंकून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, भारताच्या आशा राष्ट्रकुल इतिहासातील सर्वात अनुभवी आणि सर्वात यशस्वी भारतीय टेबल टेनिस खेळाडू अचंता शरथ कमलवर होत्या. मात्र, ४ गेम पर्यंत रंगलेल्या सामन्यात त्याला १-३ असा पराभव पत्करावा लागला.
पहिल्या दोन सामन्यानंतर बरोबर झाली असताना युवा जी साथियानने विजय मिळवत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. पहिला गेम गमावल्यानंतर त्याने पुढील तिन्ही गेम जिंकत संघाला विजय मिळवून दिलेला. त्यानंतर अखेरच्या सामन्यात हरमीत देसाईने एकतर्फी विजय नोंदवत देशाचे पाचवे सुवर्ण निश्चित केले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक
तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल






