वनडे विश्वचषक 2023मधील आपला तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांना एकमेकांविरुद्ध खेळायचा आहे. हे दोन संघ क्रिकेटविश्वात पारंपारिक विरोधक म्हणून ओळखले जातात. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. विश्वचषक 2023मध्ये शनिवारी (14 ऑक्टोबर) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. चला तर जाणून घेऊ या सामन्याविषयी महत्वाच्या गोष्टी.
वनडे विश्वचषक 2023 यावर्षी भारतात खेळला जात असून 5 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा सुरू झाली. भारतातील खेळपट्टी फलंदाजांना मदत देत असल्याचे मागच्या 10-11 सामन्यावरून समजते. अशात भारत आणि पाकिस्तानचे गोलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात, यावर सामन्या बऱ्यापैकी अबलंबून असेल. तसेच दोन्ही संघांच्या फलंदाजांना देखील संघासाठी जास्तीत जास्त धावा कशा करता येतील, हे पाहावे लागेल. जगातील सर्वात मोठे अहमदाबदमधील नरेंद्रम मोदी स्टेडियम या सामन्याचे साक्षिदार असणार आहे. मैदानांनी मैदानात भरणार असून, त्यांच्या मनोरंजनासाठी दोन्ही संघ सज्ज असतील.
हेड-टू-हेड आकडेवारी
भारत आणि पाकिस्तान शेजारी राष्ट्र असून दोन्ही देशांमधील राजकीय मतभेत वेळोवेळी पाहायला मिळाले आहेत. क्रिकेटच्या मैदानात देखील हा वादचे परिणाम पाहायला मिळतात. मागच्या मोठ्या काळापासून या दोन संघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाहीये. एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत एकूण 134 सामन्यांमध्ये हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने आले आहेत. यातील 56 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळला, असून 73 सामन्यांमध्ये पाकिस्तान संघ जिंकला आहे.
वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताचे पारडे जड!
वनडे क्रिकेटमध्ये भारताची बाजू पाकिस्तानच्या तुलनेत कमजोर दिसत असली तरी, वनडे विश्वचषकात भारताचे आकडे पाकिस्तानच्या तुलनेत जबरदस्त आहेत. वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळ आमने सामने आले आहेत. यातील एकही सामना पाकिस्तानला जिंकता आला नाहीये. सात पैकी सात सामने हे भारताच्या नावावर झाले आहेत. यावर्षी देखील भारतीय संघ आपला विजयरथ थांबणार नाही, याची सर्व काळजी घेईल.
2023 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी
वनडे विश्वचषक 2023 राऊंड रॉबिन पद्धतीने खेळला जात आहे, ज्यामध्ये प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळावे लागते. भारत आणि पाकिस्तान यांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन-दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानला विजय मिळाला असून गुणलातिकेत हे सघ्य दोन आणि तीन क्रमांकावर आहेत. शनिवारी (14 ऑक्टोबर) जेव्हा यांच्यातील सामना खेलला जाईल, तेव्हा ‘कांटे की टक्कर’ मिळेल.
खेळपट्टी आणि हवामान
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी फायद्याची राहिली आहे. याठिकाणी शेवटचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. इंग्लंडने दिलेले 283 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने अवघ्या 36.2 षटकात गाठले होते. भारतीय संघाने याठिकाणी खेळलेल्या 18 वनडे सामन्यांपैकी 10 सामने जिंकले, तर 8 सामने गमावले आहेत. दुसरीकडे पाकिस्तान याठिकाणी फक्त एक सामना खेळला आणि जिंकला आहे.
आएमडीच्या माहितीनुसार शनिवारी अहमदाबादमध्ये हवामान साधारन असेल. पावसाची किंवा ढगाळ वातावरणाची कुठलीही शक्यता वर्तवली गेली नाहीये. अशात भारत-पाकिस्तान सामन्यात कुठलाच अडथळा येणार नाही, असेच दिसते. माहितीनुसार शहरातील तापमान जास्तीत जास्त 35 अंश सेल्सियस असेल. (India-Pakistan face to face in third match of World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
शतक ठोकलं रोहितनं, पण विराटला झाला सर्वाधिक आनंद; सर्वत्र होतंय कौतुक
डी कॉक बरसला! षटकार खेचत ठोकले विश्वचषकातील सलग दुसरे शतक, जगातील चौथाच फलंदाज