---Advertisement---

भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस बनणार विलेन! जाणून घ्या कसे असेल वातावरण

babar Azam Virat Kohli
---Advertisement---

चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (2 सप्टेंबर) होणाऱ्या सामन्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण असे आहेत जे आशिया चषकातील या सामन्यासाठी मागच्या काही महिन्यांपासून वाट पाहत आहेत. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यातून आशिया चषक अभियानाची सुरुवात करेल, जो कँडीमध्ये आयोजित केला गेला आहे. असे असले तरी, चाहते आणि दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहेत.

मागच्या काही दिवासंपासून श्रीलंकेतील वातावरण खराब आहे. अशात भारत पाकिस्तान सामना देखील या पावसाच्या वातावरणामुळे रद्द केला जाण्याची शक्यता तयार होत आहे. सध्या श्रीलंकेत बालागोला वादळ सुरू आहे, जे शनिवारीही सामन्यावर प्रभाव टाकू शकते आणि सामना रद्द देखील होऊ शकतो. हवामान अंदाजानुसार सामना सुरू होण्याआधी कँडीमध्ये 68 टक्के पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच सामन्यादरम्यान संपूर्ण दिवसभर पावसासाठी अनुकूल ढगाळ वातावरण असणार आहे.

सायंकाळी 5.30 मिनिटांनी पावसाची शक्यता 60 टक्क्यांनी कमी होईल. श्रीलंकेतील हवामान विभागाकडून पुढचे काही दिवसा देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कँडीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाऊस सांगितला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार शुक्रवारी दुपारी 2.30 वाजताच्या आसपास कँडीमध्ये पाऊस येऊ शकतो. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या एक तास आधी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. अशात शनिवारी प्रत्यक्षात या सामन्यावर पावसाचा काय परिणाम होतो, हे पाहण्यासारखे असेल.

माहितीनुसार पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रद्द करावा लागला, तर गुणतालिकेत दोन्ही संघांना एक-एक गुण वाटून मिळेल. पण सामना निकाली निघाला, तर विजेत्या संघाला दोन गुण मिळतील.

महत्वाच्या बातम्या – 
सलामीवीर म्हणून कमी पडल्याचे रोहितने केले मान्य! आशिया चषकासाठी बदलणार खेळण्याची पद्धत
‘आमच्याकडे शाहीन, नसीम आणि हॅरिस नाहीत, पण…’, पाकविरुद्धच्या मॅचपूर्वी रोहितच्या विधानाची सर्वत्र चर्चा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---