---Advertisement---

पाकिस्तानवर एकटा विराटच पडला भारी! लाजवाब अर्धशतकासह टीम इंडियाला पोहोचवले 181 पर्यंत

On: रविवार, सप्टेंबर 4, 2022 9:21 PM
---Advertisement---

भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने वेगवान धावा बनवल्या. मात्र, एका बाजूने सातत्याने बळी देखील गमावले. साखळी फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करण्याची कामगिरी केली होती. या सामन्यात विराट कोहलीच्या लाजवाब अर्धशतकाने भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 181 धावा केल्या.

दोन्ही संघ सुपर फोर फेरीतील आपला हा पहिला सामना खेळत होते. यावेळी नाणेफेक पाकिस्तान संघाच्या बाजूने पडली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत, भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी वेगवान फलंदाजी करताना पावर प्लेमध्येच 54 धावा काढल्या.‌ दोघेही प्रत्येकी 28 धावा काढून माघारी परतले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव 13 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला.

मागील सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा नायक राहिलेला हार्दिक पंड्या याच्याकडून सर्वांनाच अपेक्षा होता. मात्र, तो दुसऱ्याच चेंडूवर खाते हे न कोणता तंबू परतला. एकीकडे सर्व प्रमुख फलंदाज बाद होत असताना विराट कोहली मात्र एका बाजूने उभा होता. खराब चेंडूंवर मोठे फटके खेळत त्याने संघाची धावसंख्या पुढे नेली. दीपक हुडाने महत्वपूर्ण 16 धावांचे योगदान दिले.

भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी विराटने 44 चेंडूवर 60 धावा केल्या. यात चार चौकार व एका षटकाराचा समावेश होता. रवी बिश्नोईने दोन चौकार मारल्याने भारतीय संघाने 7 बाद 181 पर्यंत मजल मारली.

‌‌

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---