पुढच्या महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारातचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाले. तसेच आयपीएलच्या आधी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना वेगवान गोलंदाज दीपक चाहरला देखील दुखापत झाला होता. आता इंग्लंड दौऱ्यात या तिघांच्या सहभागाविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी १५ किंवा १६ जून रोजी रवाना होणार आहे. तसे पाहिले, तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून बर्मिंघममध्ये खेळला जाणार आहे, पण त्याआधी संघाला २४ ते २७ जूनदरम्यान लिसेस्टरशायर आणि भारत यांच्यात सराव सामना खेळला जाणार आहे. भारत-इंग्लंड कसोटी सामना संपल्यानंतर उभय संघातील टी-२० मालिका ७ ते १० जुलैदरम्यान खेळली जाईल. उभय संघातील एकदिवसीय मालिका १२ ते १७ जुलै या काळात खेळली जाईल.
दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांनी आयपीएल २०२२ च्या मध्यातून माघार घेतली. तर दीपक चाहर (Deepak Chahar) याच कारणास्तव हंगामात सहभागी होऊ शकला नाहीये.
आता इंग्लंड दौऱ्याच्या दृष्टीने भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार आणि जडेजा इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध असणार आहेत. दोघेही तोपर्यंत फिट होतील अशी पूर्ण शक्यता वर्तवली गेली आहे. तर दुसरीकडे दीपक चाहरला मात्र या दौऱ्यात सहभागी होता येणार नाहीये. त्याला फिट होण्यासाठी पुढचा मोठा काळ लागण्याची शक्यता आहे. अंदाजे अजून दोन महिने त्याला मैदानात पुनरागमन करता येणार नाहीये.
जडेजा, सूर्यकुमार आणि दीपक लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचणार आहेत आणि त्याठिकाणी त्यांची फिटनेस चाचणी घेतली जाईल. फिटनेस चाचणीनंतर त्यांच्या नावावर विचार केला जाईल. जडेजा आणि सूर्यकुमारने जरी ही चाचणी पास केली नाही, तरीदेखील त्यांना इंग्लंड दौऱ्यावर नेले जाणार आहे. इंग्लंडमध्ये त्यांचा रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. माध्यमांतील वृत्तानुसार या तिघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशीतील मालिकेतून वगळले जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऐकलंत का? १७ कोटींनीही नाही भरलं केएल राहुलचं मन, अर्ध्या हंगामात केली पगार वाढीची मागणी!
केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवणारा रिंकू सिंग पराभवानंतर भावूक, फोटो तोडेल तुमचेही हृदय!
आरसीबीसाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती, प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी ‘हा’ आहे उपाय