भारतीय क्रिकेट संघ २०१६पासून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली या कसोटी संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु १ मे रोजी जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावरुन तिसऱ्या स्थानी फेकला गेला.
असे असले तरीही भारताला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानाचे तब्बल १ मिलियन डाॅलर अर्थात ७ कोटी ५४ लाख रुपये मिळू शकतात. २०१७, २०१८ व २०१९ रोजी भारताला विराटच्याच नेतृत्त्वाखाली हे बक्षिस मिळाले आहे.
आयसीसी दरवर्षी १ एप्रिल रोजी जो संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असतो त्याला १ मिलीयन डाॅलर व मेस अर्थात गदा बक्षिस म्हणून देते. दुसऱ्या क्रमवांकावरील संघाला ५ लाख डाॅलर तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला २ लाख डाॅलर बक्षिस म्हणून देते.
यावर्षी कसोटी चॅम्पियनशीप सुरु झाल्यामुळे या बक्षिसं आयसीसी देणार आहेत की नाही याबद्दल काहीही सांगितले नाही. परंतु भारतीय संघ ताज्या क्रमवारीनुसार जरी कसोटीत तिसऱ्या स्थानावर असला तरी १ एप्रिलच्या नियमानुसार भारतीय संघ कसोटीत अव्वल स्थानी होता. यामुळे हे बक्षिस भारताच मिळेल.
२००३ सालापासून आयसीसी मेस (गदा ) मिळवलेला कोहली हा केवळ १०वा कर्णधार आहे. त्याने २०१७मध्ये पहिल्यांदा ही गदा मिळवली होती.
भारतीय संघ नोव्हेंबर २००९ ते ऑगस्ट २०११ या काळात कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. जगातील स्टिव वाॅ, रिकी पाॅटींग, मायकेल क्लार्क, अँड्रू स्ट्राॅस, मिसबाह उल हक, ग्रॅमी स्मिथ, हशिम अमला, विराट कोहली व एमएस धोनी हेच कर्णधार आजपर्यंत ही मानाची गदा मिळवु शकले आहेत.
भारतीय संघाने यापुर्वी धोनीच्या नेतृत्त्वाखाली ही गदा २०१० व २०११ तर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली २०१७, २०१८ व २०१९ साली मिळवली आहे.
कसोटी क्रमवारीची सुरुवात २००३ साली झाली. त्यानंतर २००३ ते २००९ अशी सलग ७ वर्ष व २०१६मध्ये ही गदा ऑस्ट्रेलिया संघाकडे होती. इंग्लंडने २०१२ तर दक्षिण आफ्रिकेने २०१३ ते २०१५ अशी सगल तीन वर्ष गदा आपल्याकडे ठेवली.
२००१मध्ये ब्रिटीश क्राऊन ज्वेलर अस्प्रे व गेरार्ड यांनी २००१ मध्ये ही गदा तयार केली आहे. त्याची एकूण किंमत ३० हजार डाॅलर एवढी २००१साली होती.
ऑक्टोबर २०१६ रोजी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आला होता.
The photo all India fans have been waiting to see – Virat Kohli with the ICC Test Championship Mace! pic.twitter.com/HkRKjzmY3c
— ICC (@ICC) October 11, 2016
२०१६मध्येच सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आल्यावर त्यांच्याकडे ही गदा आली होती परंतु १ एप्रिल २०१७ या कट ऑफ डेला भारतीय संघ पुन्हा अव्वल स्थानी आल्यावर भारताला ही गदा मिळाली व बक्षिसही मिळाले.
History was made earlier this month as Pakistan were presented with the ICC Test Championship mace for the first time, WATCH! pic.twitter.com/DQtkcYMJtp
— ICC (@ICC) September 30, 2016
२०१७
तेव्हा २८ मार्च २०१७ला भारतीय संघाला धरमशाला कसोटीवेळी बक्षिस घोषीत केले होते. कारण तेव्हा कट ऑफ डेट जरी १ एप्रिल असली तरी भारताच्या क्रमवारीला कोणताही धोका नव्हता. धरमशाला कसोटी विराट कोहली खेळत नव्हता तर अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्त्व करत होता. परंतु याचा स्विकार मात्र कर्णधार विराट कोहलीने केला होता. आयसीसी हाॅल ऑफ द फेम सुनिल गावसकर यांनी विराटला गदा व १ मिलियन डाॅलरचा चेक तेव्हा दिला होता.
READ: India retains ICC Test Championship mace for being No.1 in the ICC @MRFWorldwide Test Team Rankings! – https://t.co/5eBwKjRk04 pic.twitter.com/MFF7DTR6ki
— ICC (@ICC) March 28, 2017
२०१८
२०१८मध्ये २७ जानेवारी २०१८ला आयसीसीने भारतीय संघाला बक्षिस जाहीर केले होते. तीन महिने आधीच भारतीय संघाला मेस व १ मिलीयन डाॅलरचे विजेते घोषीत करण्याचे कारण अर्थातच भारतीय संघाच्या अव्वल स्थानाला ३ एप्रिल २०१८ पर्यंत कोणताही धोका नव्हता. तेव्हा या बक्षिसासाठी कट ऑफ डेट ३ एप्रिल २०१८ होती व भारतीय संघाने जानेवारीत जोहान्सबर्ग कसोटी जिंकल्याने दक्षिण आफ्रिकेला अव्वल स्थानी जाण्याच्या सर्व संधी हुकल्या होत्या. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी भारत विरुद्ध दक्षिण टी२० मालिकेत तिसऱ्या सामन्यानंतर सुनिल गावसकर व ग्रॅम पोलाॅक यांनी विराटला ही मेस व चेक दिला होता.
NUMBER ONE! 🇮🇳@imVkohli is presented the ICC Test Championship mace by Sunil Gavaskar and Graeme Pollock! pic.twitter.com/FqI753df1D
— ICC (@ICC) February 24, 2018
२०१९
२०१९मध्ये मात्र भारतीय संघाला बक्षिसांची घोषणा १ एप्रिल २०१९ रोजीच केली. यावेळी भारतीय संघाबरोबर विराट कोहलीही आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता.
"I am sure this will stand us in good stead once the ICC World Test Championship commences later this year." – Virat Kohli on India's retention of the ICC Test Championship mace.
FULL STORY ➡️ https://t.co/6vrKLlSIst pic.twitter.com/G80LTx4sTu
— ICC (@ICC) April 1, 2019
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-४३ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात गेला थेट नग्न अवस्थेत
-काय सांगता! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झोपेत चालायचा!