---Advertisement---

IND vs AFG । रोहित शर्माचे वादळी शतक, सलग तीन षटकार मारून रिंकूने केला शेवट

On: बुधवार, जानेवारी 17, 2024 8:50 PM
Rohit Sharma
---Advertisement---

अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाने मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी खेळला. या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागच्या दोन सामन्यांमध्ये शुन्यावर बाद झालेला रोहित या सामन्यात सर्वोत्तम 121 धावांची खेळी करू शकला. भारताने या सामन्यात 4 विकेट्सच्या नुकसानावर 212 धावांपर्यंत मजल मारली. रोहितसाठी हे टी-20 कारकिर्दीतील त्याचे पाचवे शतक होते. 

भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 22 धावांवर महत्वाच्या चार विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यात नाबाद 190 धावांची भागीदारी झाली. रोहितने 69 चेंडूत 121 धावा कुटल्या. या धावा करताना एकापेक्षा एक शॉट्स त्याने मारले. एकूण 11 चौकार आणि उत्तंग षटकार रोहितच्या बॅटमधून आले. दुसरीकडे रिंकू सिंग याने 39 चेंडूत 69 धावांची खेळी केली.

अफगाणिस्तानसाठी या सामन्यात 4 षटकांमध्ये 20 धावा खर्च करून फरीद अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अजमतुल्ला उमरझाई यानेही शिबम दुबे याच्या रुपात एक विकेट घेतली. फरीदने यशस्वी जयस्वाल (4), विराट कोहली (0) आणि संजू सॅमसन (0) यांच्या विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs AFG । रोहितने मजेत घेतलेला निर्णय संघाला पडला महागात! अवघ्या 22 धावांवर चार फलंदाज तंबूत
थोडा चेंज! INDvsAFG तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहितने मजेमजेत घेतली फलंदाजी, संघात तीन महत्वाचे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---