जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया(सीसीआय)चे सचिव सुरेश बाफना यांनी रविवारी म्हटले आहे की आगामी विश्वचषकात भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये.
पुलवामा हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे 40 पेक्षा अधिक देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. तसेच या हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमजी-रिलायंस (IMG Reliance)ने पाकिस्तान क्रिकेट लीगचे प्रसारण करण्यासही नकार दिला आहे.
मेमध्ये होणाऱ्या विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे अपील करताना बाफना एएनआयशी बोलताना म्हणाले, ‘आमच्या आर्मीच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे आक्रमण आणि सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जरी सीसीआय सहायक संस्था असली तरी राष्ट्र कोणत्याही खेळाच्या आधी आहे.’
तसेच ते पुढे म्हणाले, ‘इम्रान खान यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला हवी. ते प्रधानमंत्री आहेत आणि त्यांचा जर असा विश्वास असेल की या प्रकरणात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही तर त्यांनी उघडपणे समोर यायला हवे. लोकांना सत्य समजले पाहिजे. त्यांचे उघडपणे समोर न येणे हेच संशय निर्माण करत आहे.’
याआधी सीसीआयने पुलवामा हल्ल्याला विरोध दर्शवताना मुंबईतील त्यांच्या मुख्यालयाच्या परिसरातील इम्रान खान यांचे पोस्टरही झाकले आहे.
30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये हा विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत-पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे.
मागील काही वर्षात बीसीसीआय भारत आणि पाकिस्तान संघात द्विपक्षीय मालिका घेण्यासाठी नकार देत असल्याने हे दोन संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात. हे दोन संघ शेवटचे मागील वर्षी एशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–चाहत्यांकडून एबी, कोहलीच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, पहा व्हिडीओ
–विराट, रोहित आणि धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये हा आहे मोठा फरक
–पृथ्वी शॉच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी बातमी