---Advertisement---

इंग्लंड दौरा स्म्रीतीसाठी लकी! आयसीसी टी20 क्रमवारीत पोहोचली कारकिर्दीच्या सर्वोत्त्कृष्ट स्थानी

On: मंगळवार, सप्टेंबर 20, 2022 6:11 PM
Smriti Mandhana
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्म्रीती मंधाना इंग्लंड दौऱ्यात (ENGvsIND)चांगली कामगिरी करत आहे. तिने इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 111 धावा केल्या. याचाच फायदा तिला आयसीसी टी20 क्रमवारीत झाला आहे. आयसीसीने मंगळवारी (20 सप्टेंबर) महिलांची वनडे आणि टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये स्म्रीती तिच्या टी20 कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ठ स्थानावर पोहोचली आहे.

भारताची सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त कामगिरी सुरूच ठेवली आहे. तिने टी20 नंतर झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 91 धावांची खेळी केली. यामुळे तिला ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये तीन स्थानांचा फायदा झाला आहे. ती आता सातव्या स्थानावर पोहोचली आहे. तर याआधी झालेल्या टी20 मालिकेत तिला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तिची ही आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे.

स्म्रीतीने आयसीसी टी20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग हिला मागे टाकत दुसरे स्थान गाठले आहे. तसेच ती पहिल्या स्थानांपासून 12 पॉइंट्स मागे आहे. तिचे 731 पॉइंट्स असून पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी हिचे 743 पॉइंट्स आहेत.

स्म्रीतीबरोबरच काही भारतीय खेळाडूंनाही इंग्लंड दौऱ्यात केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने आयसीसी वनडे क्रमवारीत चार स्थानांनी उडी घेत नववे स्थान गाठले आहे. अष्टपैलू दीप्ती शर्मा हिलादेखील एका स्थानाचा फायदा झाला आहे. ती आयसीसी महिला वनडे अष्टपैलूच्या क्रमवारीत आता 6व्या स्थानावर पोहोचली आहे. तर इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक करणारी यस्तिका भाटीया हिने आठव्या स्थानांनी उडी घेत 37वे स्थान गाठले आहे.

हरमनप्रीतने फलंदाजीच्या टी20 क्रमवारीत 14वे तर गोलंदाजीत रेणुका सिंगने 10वे स्थान काबीज केले आहे. फिरकीपटू राधा यादव हिला चार स्थानांचा फायदा झाला असून ती 14व्या स्थानावर पोहोचली आहे. पूनम यादव हिलाही एका स्थानाचा फायदा झाला असून 27वे स्थान गाठले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर आयर्लंडने जाहीर केला विश्वचषकासाठी संघ; हे टी20 स्टार संघात सामील; वेस्ट इंडिजला धोका
पिच क्यूरेटरकडून सचिनला मिळाली मौल्यवान भेट, मास्टर ब्लास्टरकडून दिले गेल रिटर्न गिफ्ट
क्रिकेट बदलणार! 1 ऑक्टोबरपासून या नव्या नियमांत रंगणार ‘रनसंग्राम’; वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---