भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. रविवारी (28 जानेवारी) मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने या सामन्यात 28 धावांनी विजय मिळवला असून गुणतालिकेत भारताला नुकसान सोसावे लागले. भारतीय संघ जगतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रविवारचा दिवस (28 जानेवारी) तसे पाहता कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी देणारा ठरला. दिवसाच्या सुरुवातील वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. 1997 नंतर वेस्ट इंडीज संघ ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकू शकला. शमार जोसेफ या सामन्याचा हिरो ठरला. दुसरीकडे इंग्लंडनेही भारताला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धकाका दिला. 231 धावांचे लक्ष्य भारतीय संघ शेवटच्या डावात गाठू शकला नाही. टॉम हार्टली याने शेवटच्या डावात तब्बल 7 विकेट्स घेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघांचे हे विजय अनपेक्षित होते.
इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघ गुणतालिकेत आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ मात्र गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी 2023-25 मध्ये आतापर्यंत 10 सामने खेळले असून यातील सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यातील तीन सामने त्यांनी गमावले असून एक सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाची गुणसंख्या सध्या 55 आहे. दुसरीकडे भारताच्या गुणांमध्ये घसरून आली अशून 43.33 गुण सध्या संघाकडे आहेत. भारताने डब्ल्यूटीसीच्या चाहू हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यातील दोन सामने भारताने जिंकले, तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. राहिलेला एक सामना अनिर्णित होता.
गुणतालिकेत भारताच्या आधी ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ देखील आहेत. दक्षिण आफअरिका, न्यूझीलंड आणि बांगलादेशची गुणसंख्या प्रत्येकी 50-50 इतकी आहे. भारताला डब्ल्यूटीसी हंगामात मिळालेला हा दुसरा पराभव आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघ एकदा पराभूत झाला होता. (India suffered a loss in the WTC standings due to the Hyderabad Test defeat)
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मिळाला दिलासा, ICC ने घेतला मोठा निर्णय, वाचा संपूर्ण प्रकरण
IND vs ENG । दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचे पारडे झाले जड, महत्वाचा भारतीय खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता