---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे आनंदाची बातमी

On: मंगळवार, जुलै 6, 2021 7:39 AM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. मात्र, या दौऱ्यासाठी गेल्यानंतर भारतीय संघाने सराव सामना न खेळताच कसोटी अंजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या अंतिम सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघावर सामन्यापूर्वी सराव सामना न खेळण्याने बरीच टीका झाली होती. त्यानंतर आता ही गोष्ट लक्षात घेत बीसीसीआयने इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना आयोजित करण्याची मागणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे केली होती. ही मागणी आता पूर्ण झाली असल्याचे समजत आहे.

भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघातील सर्व खेळाडू १४ जुलैपर्यंत एकत्र येतील. सध्या भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याने खेळाडू आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रपरिवारासह इंग्लंडमध्ये फिरण्याची मजा घेत आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडू एकत्र आल्यानंतर काऊंटी संघासह तीन दिवसीय सराव सामना खेळू शकतात. हा सराव सामना २० ते २२ जुलै दरम्यान होण्याची शक्यता आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सराव सामना आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनाकडून मागणी करण्यात आल्यानंतर घेतला आहे. इंग्लंड बोर्डाच्या ३ दिवसीय सराव सामन्याच्या आयोजनाच्या निर्णयावर भारतीय संघव्यवस्थापन आनंदी असल्याचे समजत आहे. कारण, सराव सामन्याची विनंती उशीरा करण्यात आली होती.

याबद्दल एका सुत्राने सांगितले की ‘आम्हाला जे हवे होते, ते मिळाले आहे. आम्हाला माहित आहे की या स्तरावर सराव सामना आयोजित करणे कठीण होते. भारतीय संघाला इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या दुविधांची कल्पना आहे.’

खरंतर २१ जुलैपासून इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धा सुरु होणार असल्याने इंग्लंडचे बहुतेक खेळाडू त्याच व्यस्त असणार आहेत. त्यामुळे आता भारताविरुद्ध सराव सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहावे लागेल.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचे सराव शिबिर डरहॅम येथे सुरु होईल. या सराव शिबिरासाठी खेळाडूंना १४ जुलैपर्यंत एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे. हे सराव शिबिर पूर्ण करुन भारतीय संघ पहिला सामना खेळण्यासाठी नॉटिंगघमला जाईल. दरम्यान, या मालिकेपूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यांमध्ये अडकला पृथ्वी शॉ, माजी क्रिकेटपटू जाफरने शेअर केलेले ‘ते’ मीम जोरदार व्हायरल

श्रीलंका क्रिकेटमधील दुष्टचक्र थांबेना, आता सापडले मॅच फिक्सिंगच्या विळख्यात

जेम्स अँडरसनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केली ‘मोठी’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---