23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान गुरुग्राम येथे होणाऱ्या आयसीसी मुकबधिरांच्या (deaf) टी20 विश्वचषकाचे यजमानपद भुषवणार आहे. याबाबतील आयोजकांनी माहीती दिली आहे.
या स्पर्धेत आठ देशांचे संघ खेळणार आहेत. यात भारत, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
या आठ संघाची दोन गटात विभागणी करण्यात येणार आहे. या दोन गटातील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
या स्पर्धेचे आयोजन मुकबधिर क्रिकेट संस्था (डिसीएस) करणार आहे. ही संस्था भारतात अंधासाठी क्रिकेटचे आयोजन, शासन आणि प्रसाराचे काम करते. ही संस्था मुकबधिरांसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (डेफ आयसीसी) संलंग्न आहे.
या स्पर्धेबद्दल मुकबधिर क्रिकेट संस्थेचे सचिव, सुमित जैन म्हणाले, “क्रिकेट आपल्या देशात हा खूप लोकप्रिय आणि सर्वाधित पाहिला जाणारा खेळ आहे. फक्त 2017 मध्ये एका आठवड्यात टीव्हीवर 717 मिलियन प्रेक्षकांनी आणि जगभरात 27 बिलियन प्रेक्षकांनी या खेळाची मजा घेतली आहे.”
ते पुढे म्हणाले, ‘आज आम्हाला विश्वास आहे की अपंगांच्या खेळाला जसे की क्रिकेटला चांगला वेग आणि पाठिंबा मिळेल.’
तसेच डेफ आयसीसीचे अध्यक्ष स्टीफन पिचोवस्की म्हणाले, “दुसऱ्या मुकबधिरांच्या टी20 विश्वचषकाचे यजमानपद भारत भूषवणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. जगभरातील संघांकडून यासाठी उत्साह प्रचंड आहे आणि भारताचा हा दौरा क्रिकेटच्या खेळ भावनेचे प्रसारण करण्यासाठी खास होईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
–विंडिज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी
–बापरे! भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही
–कर्णधार विराट कोहलीही अपवाद नाही, ही गोष्ट करावीच लागणार