---Advertisement---

ब्रेकिंग! इंग्लंडनंतर भारतीय महिला संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर, जय शहा यांनी केली घोषणा

---Advertisement---

भारतीय महिला संघाचे या वर्षातील वेळापत्रक बऱ्यापैकी आता व्यस्त असल्याचे दिसत आहे. पुढील महिन्यात भारतीय महिला संघ इंग्लंड दौरा करणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. विशेष म्हणजे भारतीय महिला संघ अगामी इंग्लंड दौऱ्यात तब्बल ६ वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. तसेच आता असेही वृत्त येत आहे की यावर्षी भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील एक कसोटी सामना खेळणार आहे. याबाबतची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिला संघाने अखेरचा कसोटी सामना १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली खेळला आहे. जय शहा यांच्या घोषणेनुसार, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियामध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवस-रात्र स्वरुपात खेळवला जाणार असून हा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकमेव सामना असेल.

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियामध्ये अखेरचा सामना ऍडलेड येथे खेळला होता. आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत ९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. या ९ पैकी एकाही सामन्यात भारतीय महिला संघाला विजय मिळवता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाने यातील ४ सामने जिंकले आहेत. तर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.

या दोन संघात सर्वात पहिला कसोटी सामना १९७७ साली खेळवण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यानंतर १९८४ साली भारतात ४ कसोटी सामने झाले होते. हे चारही सामना अनिर्णित राहिले तर १९९०-९१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ कसोटी सामने झाले होते. त्यातील एक सामना अनिर्णित राहिला तर अन्य २ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते.  २००६ साली झालेला अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

खरंतर भारतीय महिला संघ यावर्षीच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता. पण डिसेंबर २०२० मध्ये हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

इथेही भेदभाव! भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची घोषणा, टॉप ग्रेडच्या खेळाडूंना पुरुषांपेक्षा ६.५ कोटी कमी

‘तो नेहमी मला स्वातंत्र्य देत असतो,’ अव्वल भारतीय गोलंदाजाने रोहितच्या नेतृत्त्वाचे गायले गुणगान

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, आयपीएल खेळणारे क्रिकेटपटू संघाबाहेर; वाचा कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---